मोठ्या नोटा बंद झाल्याने भाविकांचे हाल

By Admin | Published: November 9, 2016 08:23 AM2016-11-09T08:23:51+5:302016-11-09T08:21:49+5:30

पाचशे व हजार रुपयांच्या नोटा मध्यरात्री पासून चलनातून बाद झाल्याने धार्मिक स्थळी देवदर्शनाला आलेल्या भाविकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे.

Due to the closure of large notes, | मोठ्या नोटा बंद झाल्याने भाविकांचे हाल

मोठ्या नोटा बंद झाल्याने भाविकांचे हाल

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
शिर्डी, दि. ९ -   पाचशे व हजार रुपयांच्या नोटा मध्यरात्री पासून चलनातून बाद झाल्याने धार्मिक स्थळी देवदर्शनाला आलेल्या भाविकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. आज पहाटे शिर्डीत दाखल झालेल्या भाविकांना खिशात पैसे असूनही संस्थान व खासगी हॉटेल मध्ये रुम मिळणे अवघड झाले. प्रवासाला बाहेर पडतांना अनेकजण १००, ५०० च्या नोटा जवळ बाळगतात, तर अनेकजण ATM  च्या भरवशावर असतात, मात्र आज हे दोन्ही पर्याय व बॅंका बंद असल्याने अचानक मोठी समस्या निर्माण झाली. यामुळे अनेकांकडे 100 च्या पुरेश्या नोटा नसल्याने त्यांना कोणीही रुम देत नाहीयेत, तसेच संस्थान प्रशासनानेही मध्यरात्रीपासूनच पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारणे बंद केल्याने भाविकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 
विशेष म्हणजे देणगी काऊंटरवरही या नोटांची देणगी स्वीकारणे बंद करण्यात आले आहे, याबाबत संस्थानचे कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सरकारी आदेश्या नुसार 500 व 1000 च्या नोटा स्वीकारण्यास असमर्थता दर्शवली. शासनाने रेल्वे, रुग्णालय सारख्या ज्या आस्थापनांना या नोटा स्वीकारण्यास अनुमती दिली त्यात संस्थाना चा समावेश नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
दरम्यान या समस्येमुळे प्रसादालयात अनेक भाविकांना उपाशी राहावे लागेल का? या प्रश्नावर मात्र त्यांनी भोजनालयात व्यवस्थपनाची कार्योत्तर मंजुरी घेऊन मोफत व्यवस्था करता येतील असे सांगितले. 

 

Web Title: Due to the closure of large notes,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.