बंदमुळे कांद्याचे भाव गडगडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 12:08 AM2017-09-19T00:08:48+5:302017-09-19T00:09:08+5:30

नाशिक : गेल्या चार ते पाच दिवसांपासून बंद असलेल्या जिल्ह्यातील १४ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कांद्याचे लिलाव सोमवारी (दि.१८) पूर्ववत सुरू झाले; मात्र चार दिवसांच्या बंदमुळे कांद्याच्या दरात ३०० ते ३५० रुपयांची घसरण झाली. बागलाण व लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक न झाल्याने बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट असल्याचे सूत्रांचे म्हणणे होते.

Due to the closure, the prices of onion have collapsed | बंदमुळे कांद्याचे भाव गडगडले

बंदमुळे कांद्याचे भाव गडगडले

Next

नाशिक : गेल्या चार ते पाच दिवसांपासून बंद असलेल्या जिल्ह्यातील १४ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कांद्याचे लिलाव सोमवारी (दि.१८) पूर्ववत सुरू झाले; मात्र चार दिवसांच्या बंदमुळे कांद्याच्या दरात ३०० ते ३५० रुपयांची घसरण झाली. बागलाण व लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक न झाल्याने बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट असल्याचे सूत्रांचे म्हणणे होते.
दरम्यान, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांना सोमवारपासून कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील लिलाव पूर्ववत सुरू न झाल्यास व्यापाºयांंचे परवाने रद्द करण्याची तंबी दिली होती. जिल्हाधिकाºयांच्या या इशाºयानंतर जिल्ह्णातील १४ पैकी १२ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्यासह अन्य फळभाज्यांचे लिलाव पूर्व पदावर आले. मागील आठवड्यात बुधवारी (दि.१३) दुपारी १५०० रुपयापर्यंत असलेले कांद्याचे क्ंिवटलचे दर सोमवारी बाजार बंद होण्याच्या वेळी ११५० पर्यंत खाली घसरले. आयकर विभागाच्या छाप्यामुळे बाजार समित्यांमधील कांदा व्यापाºयांनी पुकारलेल्या अघोषित संपामुळे गेल्या तीन-चार दिवसांत कोट्यवधींचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. दिवसाला सरासरी दीडशे ते दोनशे क्ंिवटल कांद्याची आवक नाशिकच्या १४ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये होते. मागील आठवड्यात कांद्याची आवक वाढल्याने कांद्याचे भाव एका महिन्यात १३०० रुपयांनी घसरल्याचे चित्र होते. केंद्र सरकारने नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कांद्याचे भाव व अहवाल मागविला आहे. मागील महिन्यात २८०० रुपयांपर्यंत क्विंटलला गेलेला भाव एका महिन्याभरातच आवक वाढल्याने चक्क १५०० रुपयांपर्यंत गडगडला होता. तो आता बाजार सुरू होताच ११५० पर्यंत खाली आल्याने कांदा उत्पादक शेतकºयांची चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आयकर विभागाच्या धाडसत्रामुळे व्यापाºयांनी बाजार समित्यांना पत्र देऊन काही दिवसांसाठी लिलावात सहभागी होता येणार नाही, असे कारण दिले होते. सरकारच्या नवीन धोरणामुळे कांदा साठवणुकीवर मर्यादा आली आहे. या मर्यादेमुळेच कांदा व्यापारी कांदा साठवणुकीस तयार नसून, त्यामुळे कांदा खरेदीही करण्यास नाखूश असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांचे म्हणणे होते. आता बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू झाल्याने कांदा विक्रीसाठी जादा प्रमाणात येण्याची चिन्हे आहेत.लासलगाव येथे आजपासून लिलाव
च्लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवार (दि.१९)पासुन व्यापारी लिलावात सहभागी होणार आहेत. सोमवार पासून बाजार समित्यामध्ये कांदा लिलाव सुरु करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी आणि व्यापारी वर्गात झाला होता .मात्र लासलगांव येथे कांदा खळ्यात पाणी असल्याने माल टाकण्यास जागा नसल्यामुळे लासलगांव बाजार समितितील कांदा लिलाव बंद होते. मंगळवार पासून लिलाव पुन्हा सुरू होणार असल्याचे समजते. शुक्र वार पासून बाजार समितीत कोणतेही व्यवहार झाले नसल्याने बाजार समितीत शुकशुकाट होता. शनिवारी व रविवारी झालेल्या पावसामुळे कांद्याच्या खळयामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने कांद्याचे नुकसान झाले. या मुळे सोमवारी बाजार समितीत लिलाव होवु शकले नाही.

Web Title: Due to the closure, the prices of onion have collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.