काम बंद केल्याने पुरवठा खाते संतापले कारवाईची धमकी

By admin | Published: May 31, 2015 01:03 AM2015-05-31T01:03:43+5:302015-05-31T01:04:06+5:30

काम बंद केल्याने पुरवठा खाते संतापले कारवाईची धमकी

Due to the closure of the work, the threat of action against the supply side of the account | काम बंद केल्याने पुरवठा खाते संतापले कारवाईची धमकी

काम बंद केल्याने पुरवठा खाते संतापले कारवाईची धमकी

Next

  नाशिक : सुरगाणा धान्य घोटाळ्या प्रकरणी सात तहसीलदारांना राज्य शासनाने निलंबित केल्याच्या निषेधार्थ महसूल खात्याने पुरवठा खात्याच्या कामकाजावर टाकलेला बहिष्कारामुळे पुरवठा खात्याचे कामकाज ठप्प झाल्याचे पाहून अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने पुरवठा विभागाचे कामकाज पाहणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा विचार सुरू केला असून, तसे धमकी देणारे दूरध्वनीही येऊ लागले आहेत. गेल्या दहा दिवसांपासून पुरवठा खात्याचे कामकाज पूर्णपणे ठप्प होऊन त्याचा धान्य वितरणावर परिणाम झाला आहे. रेशनमध्ये धान्य मिळत नसल्याची शिधापत्रिकाधारकांची तक्रार तर अन्नधान्य उतरवून घेतले जात नसल्यामुळे वाहतूकदारांचे नुकसान होत आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामावर बहिष्कार टाकल्यामुळे मंत्रालयात पुरवठा विषयक माहितीच पोहोचत नसल्याने त्याचा मंत्रालयाच्या कामावरही परिणाम होऊ लागला आहे. दहा दिवसांपासून हीच परिस्थिती असल्यामुळे तसेच या बंदबाबत कोणताही तोडगा निघत नसल्याने अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय चिंतित आहेत. अशा पातळीवर त्यांनी आता पुरवठा खात्याचे काम पाहणाऱ्या अधिकाऱ्यांना धाकदपटशा दाखविण्यास सुरुवात केली आहे. पुरवठा खात्याचे काम जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवेत मोडत असल्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम नाकारल्यास त्यांच्याविरुद्ध ‘मेस्मा’ची कारवाई केली जाईल, अशी धमकी देण्यास सुरुवात झाली आहे. एकीकडे महसूल संघटनांनी कामावर बहिष्कार टाकण्याचा घेतलेला निर्णय, तर दुसरीकडे काम न केल्यास कारवाई पदरात पडणार असल्याचे पाहून कर्मचारी पेचात सापडले आहेत. सोमवारी या संदर्भात महसूल संघटना ठोस निर्णय घेणार असल्याने त्यानंतरच या वादावर पडदा पडण्याची शक्यता व्यक्तकेली जात आहे.

Web Title: Due to the closure of the work, the threat of action against the supply side of the account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.