नाशकात ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 01:56 PM2018-02-11T13:56:17+5:302018-02-11T14:00:56+5:30
द्राक्ष पंढरी आणि वाईन कॅपिटल अशी जगभर ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बांगावार ढगाळ वातावणरामुळे विपरीत परिणाम होत असून ओखी वादळानंतर नाशिक जिल्ह्यात सातत्याने ढगाळ वातावरण असल्याने द्राक्षबागांवर भुरीचा प्रादुर्भाव वाढला आहे.
नाशिक : द्राक्ष पंढरी आणि वाईन कॅपिटल अशी जगभर ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बांगावार ढगाळ वातावणरामुळे विपरीत परिणाम होत असून ओखी वादळानंतर नाशिक जिल्ह्यात सातत्याने ढगाळ वातावरण असल्याने द्राक्षबागांवर भुरीचा प्रादुर्भाव वाढला आहे. काढणीला आलेल्या बागांचे नुकसान रोखण्यासाठी शेतकऱ्यांना द्राक्षबागा अंतिम टप्प्यात असताना फवारणीचा खर्च वाढला असून, शेतकरी चिंतित झाले आहेत.
हवामान विभागाने कोकणासह मध्य महाराष्ट्र व अन्य भागात पावसाचा अंदाज वर्तवलेला असताना विदर्भ व मराठवाड्यातील काही भागात गारपीठ झाली आहे. या वातावरण बदलाचा प्रभाव नाशिकच्या वातावरणातही दिसून येत असून गेल्या दोन तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत. नाशिक शहर व आसपासच्या परिसरात ढगाळ वातावरण असून पावसाच्या भितीने द्राक्ष उत्पादक शेतकºयांच्या चिंतेत भर घातली असून द्राक्षांवरील भुरीचे नियंत्रण करण्यासोबतच अवकाळी पाऊस झाल्यास काढणीला आलेले पीक कसे वाचवायचे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. अंतिम टप्प्यातील बागा वाचविण्यासाठी द्राक्ष उत्पादक भुरी नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक फवारणीची खबरदारी घेत आहेत. भुरी नियंत्रणासाठी सल्फरचा वापर करण्याचे प्रमाण शेतकºयांमध्ये दिसून येत आहेत. परंतु, निर्यातक्षम द्राक्षांच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होऊ नये याचीबी खबरदारी शेतकरी घेताना दिसून येत आहेत. चुकीच्या औषधांची फवारणी अथवा औषधाचे अधिक प्रमाण यामुळे निर्यातक्षम द्राक्षांची प्रतवारी घसरण्याचा धोका टाळण्याची कसरत शेतकºयांना करावा लागत आहे.त्यामुळे शेती तज्ज्ञांकडून द्राक्ष बागांच्या अंतीम टप्प्यात योग्य औषध व औषधाचे प्रमाण याविषयी विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. तसेच फवारणी करताना कमी कार्यक्षमतेपासून मध्यम कार्यक्षमतेचे फवारणी यंत्रे वापरण्यासोबतच फवारणीमुळे मण्यांवर फवारणीचे द्रावण ओघळून येणार नाही. अथवा फवारणीवेळी सल्फरचे डाग पडणार नाही, याची दक्षता घ्यावी, असा सल्ला कृषितज्ज्ञांनी दिला आहे. सल्फर वापरलेल्या बागेमध्ये जैविक नियंत्रण घटकांचा वापर शक्य तेव्हा करावा. जैविक नियंत्रणामध्ये ट्रायकोडर्मा, बॅसिलस सबिटलीस आणि अॅम्पिलोमायसीस यांचा वापर शक्य आहे. तसेच फवारणीद्वारे पोटॅशिअम व कॅल्शियमचा वापर केल्यास बुरशीनियंत्रणाला फायदा होत असल्याचा शेतकºयांमध्ये समज आहे. परंतु, सध्याच्या बदलत्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर कोणतेही औषध अथवा उर्वरक वापरतांना शेतकºयांनी कृषितज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक बनले आहे.