ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतातुर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 05:45 PM2019-02-03T17:45:07+5:302019-02-03T17:45:49+5:30
खामखेडा : गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण तयार झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. चालू वर्षी अल्पसा पाऊस झाल्याने विहिरींनी तळ गाठला आहे.परिणामी पाणी पाहिजे त्याप्रमाणात पाणी नव्हते. तरीही शेतकऱ्यांनीे रब्बी हंगामातील गहू हरभरा तसेच रांगड्या कांद्या बरोबर उन्हाळी कांद्याची लागवड केली आहे. मध्यतरी विहिरींच्या पाण्याच्या पातळीत घट झाली होती. तेव्हा पिके पाण्याअभावी सोडावी लागतील की काय? याची चिंता शेतकºयांना वाटू लागली होती.
खामखेडा : गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण तयार झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.
चालू वर्षी अल्पसा पाऊस झाल्याने विहिरींनी तळ गाठला आहे.परिणामी पाणी पाहिजे त्याप्रमाणात पाणी नव्हते. तरीही शेतकऱ्यांनीे रब्बी हंगामातील गहू हरभरा तसेच रांगड्या कांद्या बरोबर उन्हाळी कांद्याची लागवड केली आहे. मध्यतरी विहिरींच्या पाण्याच्या पातळीत घट झाली होती. तेव्हा पिके पाण्याअभावी सोडावी लागतील की काय? याची चिंता शेतकºयांना वाटू लागली होती.
चालू वर्षी सुरवातीपासून वातावरण चांगले असल्याने गहू, हरभरा, कांदे आदी पिके मोठी जोमात होती.वातावरण चांगले असल्याने या वर्षी शेतकर्याला पिकावर कोणत्याही प्रकारची औषधाची फवारणी करण्याची वेळ आली नव्हती. असेच या वर्षी गेल्या दीड महिन्यापासून थंडी चांगल्या प्रमाणात असल्याने ती पिकांसासाठी पोषक होती. या थंडीमुळे पिकांना पाण्याची मोठ्या प्रमाणात गरज भासत नव्हती. काही शेकºयांनी तर पंधरा-पंधरा दिवस पिकांना पाणी दिले नव्हते, तरीही पिके जोमात आहेत.
परंतु गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झशला असून थंडी अचानक गायब झाली आहे. आकाशात ढगाळ वातावरण तयार झाल्याने वातावरणात ऊष्णता जाणवू लागली आहे. उन्हाळी कांद्याचे पीक जोमात आहे. त्याची पूर्णपणे वाढ होऊन आता त्याचा कांदा गळतीला सुरवात होणार आहे. परंतु या ढगाळ वातावरणामुळे कांद्या पिकावर मावा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्याता आहे. कांद्याचा गळतीवर परिणाम होऊन कांद्याच्या उत्पादन घट होईल की काय? याची भीती शेतकºयांना वाटत आहे. तसेच गहू व हरभºयाचे पिकेही जोमात आहेत. गव्हाचे पीक आता आेंबी काढली असून आता त्याचे दाणे भरायला सुरवात झाली आहे. तेव्हा या ढगाळ वातावरणामुळे त्यावर ताबोºया रोगाचा प्रादुर्भाव होणाची शक्यता असते. यामुळे गव्हाच्या उत्पादनात घट होते. तसेच हरभरा पिके आता फुले लागून घाटे लागली आहेत. या ढगाळ वातावरणामुळे या हरभरा पिकावर घाटआळई पडण्याची शक्यता असते. या आळीईमुळे हरभरे घाटे भरण्याचे आतच पोकळ पडतात त्यामुळे हरभºयाच्या उत्पादन घटण्याची शक्यता असते.
या वर्षी विहिरींना पाणी कमी असल्याने काही शेतकºयांनी पुढे उन्हाळी कांद्यासाठी पाणी राहणार नाही. म्हणून रंगडा कांद्याची लागवड केली आहे. तो आता काढणीसाठी तयार झाला आहे. या ढगाळ वातावरणा तयार होऊन जर पाऊस आला तर हा कांदा शेतात सडेल कि काय याची भीती शेतकरी वर्गात तयार झाली.