ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक धास्तावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 05:52 PM2018-12-04T17:52:36+5:302018-12-04T17:52:50+5:30
सायखेडा : हिवाळ्याची सुरवात होताच वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत असून दिवसभरात कधी ऊन तर कधी सावली आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष पिकावर भुरीचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे
सायखेडा : हिवाळ्याची सुरवात होताच वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत असून दिवसभरात कधी ऊन तर कधी सावली आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष पिकावर भुरीचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे खराब हवामानामुळे द्राक्ष मण्यांच्या फुगवणीवर परिणाम होऊन तडे जाण्याची शक्यता असल्याने शेतकरी धास्तावले आहे
वर्षातील एकदाच घेतले जाणारे शेतीतील सर्वात महागडे आणि खूपच भांडवल खर्च होणारे पीक आहे वर्षात एकदाच घेतले जात असल्याने शेतकरी विशेष काळजी घेऊन द्राक्ष पिकवत असतो द्राक्ष उत्पादक शेतकर्यांना कधी नैसिर्गक तर कधी व्यापारी, वाढती महागाई, औषध कंपन्यांची मनमानी , खतांचे वाढते बाजारभाव यांचा सामना करावा लागतो वर्षानुवर्षे अनियमति पाऊस, वाढती थंडी, विविध रोगांचा प्रादुर्भाव यामुळे शेतकरी भुईसपाट झाला आहे
दुष्काळ परिस्थितीमुळे विहिरींना असलेले पाणी जनावरांच्या चार्यांना न देता शेतकऱ्यांनी द्राक्ष बागेला देऊन फळधारणा केली आहे एकरी किमान दोन ते अडीच लाख रु पये खर्च करून द्राक्ष बाग पिकवली असतांना काही दिवसांपूर्वी वाढती थंडी आण िदोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे शेतकरी हवालिदल झाले आहे. या काळात भुरीच्या रोगाची शक्यता जास्त प्रमाणात असते तसेच द्राक्ष मन्यांना तडे जाण्याची शक्यता आहे या वातावरणात फुगवणीवर परिणाम होऊन फुगवण थांबण्याची शक्यता जास्त असल्याने शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.