नाशिकमध्ये थंडीमुळे मागणी वाढल्याने सुक्यामेव्याचे भाव वधारले, काजू दोनशे रुपयांनी तर किसमिस 50 रुपयांनी महागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 02:17 PM2017-12-01T14:17:34+5:302017-12-01T14:31:36+5:30

गेल्या वर्षीच्या मोसमात काजुचे उत्पादनात झालेली घट आणि नवीन पीक बाजारात येण्यास उशीर झाल्याने काजूचे भाव कडाडले असून गतवर्षापेक्षा यंदा काजूचे दर प्रकिकिलो दोनशे रुपयांनी वधारले आहे.

Due to cold weather in Nashik, prices of dry fruit are increase | नाशिकमध्ये थंडीमुळे मागणी वाढल्याने सुक्यामेव्याचे भाव वधारले, काजू दोनशे रुपयांनी तर किसमिस 50 रुपयांनी महागला

नाशिकमध्ये थंडीमुळे मागणी वाढल्याने सुक्यामेव्याचे भाव वधारले, काजू दोनशे रुपयांनी तर किसमिस 50 रुपयांनी महागला

Next
ठळक मुद्देगेल्या वर्षाच्या तुलनेत काजू दोन शेरुपयांनी महागकिसमिसही 50 रुपयांनी महागले थंडीच्या पार्श्वभूमीवर सक्यामेव्याला मागणी वाढली

नाशिक : गेल्या वर्षीच्या मोसमात काजुचे उत्पादनात झालेली घट आणि नवीन पीक बाजारात येण्यास उशीर झाल्याने काजूचे भाव कडाडले असून गतवर्षापेक्षा यंदा काजूचे दर प्रकिकिलो दोनशे रुपयांनी वधारले आहे. त्याचप्रमाणो हिवाळ्य़ाच्या पाश्र्वभूमीवर सुका मेवा खरेदी करणा:या ग्राहकांची संख्या वाढल्याने बेदाण्यांचेही भाव वधारले आहे. सुक्या मेव्यातील अन्य पदार्थाचे भाव मात्र स्थिर असून वाढत्या थंडीच्या पाश्र्वभूमिवर सुक्यामेव्याला मोठय़ा प्रमाणात मागणी वाढली आहे.
हिवाळा ऋ तूत आरोग्याची काळजी घेण्यासाठी व्यायामाबरोबरच आहारवरही लक्ष केंद्रित केले जाते. या मोसमात जीममध्ये जाणा:यांची संख्या वाढते. व्यायाम आणि वाढती भूक यांना पोषक असा आहार घेण्यासाठी डिंक, मेथी आदींपासून तयार केलेले लाडूंचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. हे पदार्थ बनविण्यासाठी ड्रायफ्रूट वापरले जात असल्याने काजू, बदाम, पिस्ते, खारिक, खोबरे आदींना प्रचंड मागणी असते. यंदाही थंडीचा प्रभाव जसजसा वाढू लागला आहे, तशी ड्रायफ्रूटची मागणी वाढू लागली आहे. हिवाळयात वाढणारी भूक आणि पचनशक्ती यांच्यामुळे खास पदार्थ बनविण्यात येतात. त्यात डिंक लाडू आणि मेथीचे लाडू यांचे प्रमाण जास्त असते. ते बनविण्यासाठी डिंक, खारिक, खोबरे, तुप आदींचा वापर केला जातो. पचणासाठी जड असणारे या पदार्थाचे हिवाळ्य़ात चांगले पचन होते. यामुळे हिवाळ्य़ात थंडीचे प्रमाण वाढले की अनेक कुटुंबामध्ये सुक्यामेव्यापासून विविध पदार्थ बनविण्याची लगबग दिसून येत आहे.

ड्रायफ्रूटचे प्रतिकिलोचे भाव
खारा पिस्ता- 1000 रुपये
साधा पिस्ता- 1600 रुपये
बदाम -870 रुपये
खोबरे-210 रुपये
आक्रोड-800 रुपये
अंजीर- 800 रुपये
खारीक-180 रुपये
काळी खारीक- 250 रुपये
किसमिस-250 रुपये
काळा-400 रुपये

 

Web Title: Due to cold weather in Nashik, prices of dry fruit are increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.