कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्ष पंढरी संकटात, निर्यातक्षम मालाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 09:54 PM2018-12-30T21:54:36+5:302018-12-30T22:04:36+5:30

जगभर द्राक्ष पंढरी आणि वाइन कॅपिटल अशी ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्षबागांवर हवामान बदलामुळे विपरीत परिणाम होत आहे. गेल्या महिनाभरात कडाक्याच्या थंडीनंतर गेल्या आठवड्यातील एक दोन दिवसाचे ढगाळ वातावरण आणि त्यानंतर अचानक तापमान घसरून ५अंश सेल्सिअसपर्यंत घसरले असून जिल्ह्यातील काही बागातील तपमान शून्य अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने द्राक्षमणी फुटण्याचा धोका वाढला आहे.सातत्याने होणाऱ्या हवामान बदलामुळे द्राक्षबागांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्यासोबतच निर्यातक्षम द्राक्षांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान असल्याने शेतकरी चिंताक्रांत झाला आहे.

Due to cold winter in the grape storm, the exportable goods hit | कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्ष पंढरी संकटात, निर्यातक्षम मालाला फटका

कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्ष पंढरी संकटात, निर्यातक्षम मालाला फटका

Next
ठळक मुद्देथंडीमुळे द्राक्ष मणी तडकण्याचे प्रमाण वाढलेहवामान बदलामुळे द्राक्ष पंढरीवर संकटाचे ढग निर्यातक्षम द्राक्षांचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंताक्रांत

नाशिक : जगभर द्राक्ष पंढरी आणि वाइन कॅपिटल अशी ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्षबागांवर हवामान बदलामुळे विपरीत परिणाम होत आहे. गेल्या महिनाभरात कडाक्याच्या थंडीनंतर गेल्या आठवड्यातील एक दोन दिवसाचे ढगाळ वातावरण आणि त्यानंतर अचानक तापमान घसरून ५ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले असून जिल्ह्यातील काही बागातील तपमान शून्य अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने द्राक्षमणी फुटण्याचा धोका वाढला आहे.सातत्याने होणाऱ्या हवामान बदलामुळे द्राक्षबागांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्यासोबतच निर्यातक्षम द्राक्षांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान असल्याने शेतकरी चिंताक्रांत झाला  आहे. 
संपूर्ण हंगामात विशेष काळजी घेऊन जोपासलेल्या द्राक्षबागा गेल्या महिन्यातील कडाक्याच्या थंडीमुळे साखरभरणी काही प्रमाणात लांबली असतानाच गेल्या दोन-तीन दिवसांत तापमानाचा पारा वधारत असताना तापमानात कमालीची घट झाली असून पारा घसरल्याने द्राक्षमणी तडकल्याने द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच ज्या भागात तपमान ५ अंशाहून अधिक आहे, अशा परिसरातही थंडीमुळे द्राक्षांची साखरभरणी होण्याचा कालावधीही लांबला आहे. या परिस्थितीत वाढीला लागलेल्या द्राक्षबागांमधील मणी वाचविण्यासाठी शेतऱ्याकडून बागांमध्ये शेकोटी पेटवून ऊब निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. तसेच हवामान बदलामुळे द्राक्षबागांना भुरीसह डावणी, करप्या या रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.

अशा परिस्थितीत कृषी तज्ज्ञांकडून द्राक्षबागांच्या अंतिम टप्प्यात योग्य औषध व औषधाचे प्रमाण याविषयी विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. परंतु, औषध फवारणी करताना कमी कार्यक्षमतेपासून मध्यम कार्यक्षमतेची फवारणी यंत्रे व औषधे वापरण्यासोबतच फवारणीमुळे द्राक्षमण्यांवर फवारणीचे द्रावण ओघळून येणार नाही अथवा फवारणीवेळी सल्फरचे डाग पडणार नाही याची दक्षता घ्यावी, सल्फर वापरलेल्या बागेमध्ये जैविक नियंत्रण घटकांचा वापर शक्य तेव्हा करावा, असा सल्लाही कृषितज्ज्ञाकडून दिला जात आहे. त्यामुळे द्राक्षबागा संकटात असताना शेतकरी मात्र समस्येवर मार्ग काढण्याच्या विचारांनी चिंताक्रांत झाला आहे. द्राक्ष शेती मार्गदर्शकांच्या मतानुसार, द्राक्षबागांना हवामान बदलामुळे धोका संभवत असला तरी शेतकºयांनी अतिघातक औषधांचा अधिक वापर न करता तज्ज्ञांच्या सल्ल्याने बागांची योग्य काळजी घेण्याची गरज आहे. तापमानाचा पारा घसरला असला तरी सर्व क्षेत्रात तापमान सारखेच असते, असे नाही. त्यामुळे विहीर आणि खोलगट भागालगत अगदी नीचांकी सहा ते पाच अंशांपर्यंत तापमान असलेल्या भागातच शेतकºयांनी शेकोटी पेटवून बागांना ऊब देणे आवश्यक आहे. 

निर्यात घटण्याची शक्यता 
गेल्यावर्षी नाशिक जिल्ह्यातून सुमारे एक लाख दोन हजार ८१६ मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली होती. परंतु, यावर्षी थंडीच्या कडाख्याने द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यामुळे निर्यातक्षम द्राक्षांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. एकीकडे द्राक्ष बागा संकटात असताना शेतºयांना मात्र बागा साखर भरणीच्या काळात असल्याने अति तीव्रतेच्या औषधांचा वापर करता येत दुसरीकडे द्राक्षमणी फू टल्याने बागांचे नूकसान होऊन हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.   

Web Title: Due to cold winter in the grape storm, the exportable goods hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.