टॅँकर आपल्या दारी संकल्पनेमुळे दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:24 AM2019-05-13T00:24:42+5:302019-05-13T00:25:14+5:30
देवळा : शहरात पाण्याची तीव्र टंचाईदेवळा : शहरात पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे नागरिक त्रस्त झालेले असताना देवळा नगरपंचायतीने टँकर तुमच्या दारी ही संकल्पना राबवित टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
देवळा : शहरात पाण्याची तीव्र टंचाईदेवळा : शहरात पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे नागरिक त्रस्त झालेले असताना देवळा नगरपंचायतीने टँकर तुमच्या दारी ही संकल्पना राबवित टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
लोहोणेर येथे गिरणा नदीत असलेल्या उद्भव विहिरीवर व कूपनलिकांवर देवळा शहराचा पाणीपुरवठा अवलंबून असतो. गिरणा नदीतून हे पाणी सरस्वती वाडी येथील जलकुंभात टाकण्यात येथे व नंतर ते वितरित केले जाते. गिरणा नदीला चणकापूर व पुनंद धरणातून पाण्याचे आवर्तन सुटते. त्या काळात देवळा शहराचा पाणीपुरवठा सुरळीत सुरू असतो; परंतु गिरणा नदीपात्र कोरडे झाले की शहराचा पाणीपुरवठा ठप्प होतो व शहरात पाणीटंचाई निर्माण होते.
गिरणा नदीला पुढचे पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्यावर शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत सुरू होतो; परंतु या आवर्तनांच्या मधील काळात नगर पंचायतीला शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी मोठी यातायात करावी लागते. सरस्वतीवाडी येथील पाण्याचा जलकुंभ भरला की शहरात आळीपाळीने सर्व भागात पाणीपुरवठा केला जातो. यामुळे पाणी सोडण्याची वेळ जलकुंभ भरण्यावर अवलंबून असते. सध्या आठ दिवसांतून अर्धा तास नळांना पाणी येते; परंतु त्याने शहरातील नागरिकांची गरज भागत नाही व पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते.
नगरपंचायतीने यातून मार्ग काढत टँकर आपल्या दारी ही संकल्पना राबवित सहा टॅँकरद्वारे शहर व उपनगरात पाणीपुरवठा सुरू केला आहे. प्रत्येक घरापुढे टॅँकर उभा करून घरासाठी २०० लिटर पाणी दिले जात आहे. यामुळे टँकरच्या पाण्यासाठी नागरिकांची गर्दी, गोंधळ तसेच पाण्याची नासाडी होत नाही. ज्या घरापुढे टँकर आला की त्या घरातील महिलांना शांतपणे पाणी भरता येते. तिसऱ्या दिवशी शहराच्या प्रत्येक भागात पाण्याचा टँकर येत असल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सुसह्य होत आहेत. गिरणा नदीला पुढील आवर्तन येईपर्यंत नागरिकांना नगरपंचायतीचे पाण्याचे टँकर आधार ठरत आहेत.