चुकीच्या बाजूने गाडी चालवणे पडले महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 06:14 PM2018-09-18T18:14:12+5:302018-09-18T18:14:45+5:30

चालकास कारावास : ४८ हजार रुपये दंड

Due to costly driving carriage costlier | चुकीच्या बाजूने गाडी चालवणे पडले महाग

चुकीच्या बाजूने गाडी चालवणे पडले महाग

Next
ठळक मुद्देसदर खटला प्रथम न्यायदंडाधिकारी सौ. अर्चना तामणे यांच्यापुढे चालला

येवला : रॉँग साईडने अर्थात चुकीच्या बाजूने गाडी चालवत दोघांचा बळी घेणाऱ्या चालकास येथील प्रथर्म वर्ग न्यायदंडाधिका-यांनी सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आणि ४८ हजार ८०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.
याबाबतचे सविस्तर माहिती अशी की, दि. १४ आॅगस्ट २०१० रोजी फिर्यादी विलास आसाराम कुमावत हे चार लोकांसमवेत स्विफ्ट डिझायर या वाहनाने येवला मार्गे भद्रा मारुती येथे दर्शनासाठी जात असताना आरोपी रमणलाल बन्सीलाल पारख (रा. नाशिकरोड) याने रॉँग साईडने इनोव्हा कार वेगात चालवून कुमावत यांच्या वाहनात धडक मारली. त्यात दोघांचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले होते. याप्रकरणी कुमावत यांनी येवला शहर पोलिसात फिर्याद दिली होती. पोलीस हवालदार आर. ए. जोंधळे यांनी तपास करुन दोषारोपपत्र सादर केले होते. सदर खटला प्रथम न्यायदंडाधिकारी सौ. अर्चना तामणे यांच्यापुढे चालला. न्यायालयाने आरोपी रमणलाल पारख यांना दोषी ठरवत वेगवेगळ्या कलमाखाली सहा महिन्यांच्या कारवासाची आणि सुमारे ४८ हजार रुपये ८०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारपक्षाच्यावतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता आनंद वैष्णव यांनी सात साक्षीदारांचे जबाब नोंदवले. आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने शिक्षा सुनावली.
वेगवेगळी शिक्षा
पारख यांच्याविरुद्ध भादंवि कलम २७९, ३०४(अ), ३३८, ४२७ आणि मोटार वाहन कायदा कलम १८४, ११९/१७७, १३४/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सा-या कलमांबद्दल न्यायालयाने वेगवेगळी शिक्षा सुनावली. सदर शिक्षा आरोपीला एकाच वेळी भोगायची आहे.

Web Title: Due to costly driving carriage costlier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक