नांदगावी मालगाडीची कपलिंग तुटल्याने धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 02:35 PM2019-05-16T14:35:12+5:302019-05-16T14:35:29+5:30
नांदगाव : ज्वलनशील इंधन भरलेल्या ५२ डब्यांच्या मालगाडीच्या एका डब्याची कपलिंग नांदगाव रेल्वे स्टेशनपासून दीड किमी अंतरावर अचानक तुटल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांची गुरूवारी सकाळी चांगलीच धावपळ उडाली. कपलिंग तुटल्याने ४० डब्बे व इंजिन पुढे निघून गेले तर गार्डच्या १२ डब्यासह उरलेले मागेच राहिले.
नांदगाव : ज्वलनशील इंधन भरलेल्या ५२ डब्यांच्या मालगाडीच्या एका डब्याची कपलिंग नांदगाव रेल्वे स्टेशनपासून दीड किमी अंतरावर अचानक तुटल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांची गुरूवारी सकाळी चांगलीच धावपळ उडाली. कपलिंग तुटल्याने ४० डब्बे व इंजिन पुढे निघून गेले तर गार्डच्या १२ डब्यासह उरलेले मागेच राहिले. दीड तास दुरु स्तीला लागल्याने मालगाडीच्या मागे असलेल्या डाऊन लाईनच्या (भुसावळकडे) लांब पल्याच्या अनेक प्रवासी गाड्या ठिकठिकाणी थांबून राहिल्या. मात्र डब्यांमध्ये ज्वलनशील इंधन असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली होती. नांदगाव येथे चालक बदलण्यात येत असतो. त्यामुळे गाडीचा वेग कमी होता. म्हणून थोडक्यात निभावले. पानेवाडीच्या भारत पेट्रोलियम प्रकल्पातून निघालेली ५२ डब्यांची मालगाडी, सकाळी सुमारे १०.२० वा. नांदगावच्या अलीकडे इदगाह स्थानाच्या दरम्यान ४० व्या डब्याची कपलिंग अचानक खळळ खट्याक आवाज करत तुटल्याने थांबली. तलाडी (जिल्हा चन्द्रपूर) कडे जाणाºया या मालगाडीत एचएसडी (युरो ४) (हायस्पीड डिझेल) इंधन भरलेले होते. कपलिंग तुटल्याने ४० डब्बे व इंजिन पुढे निघून गेले तर गार्डच्या १२ डब्यासह उरलेले मागेच राहिले. दरम्यान ब्रेक्सची सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित झाल्याने इंजिनला जोडलेले डब्बे व अलग झालेले डब्बे जागच्या जागीच थांबून गेले. गाडी वेगात असती व डब्बे रु ळावरून खाली घसरले असते तर पुढच्या अनर्थाची कल्पनाच केलेली बरी. अशी चर्चा अपघात स्थळी सुरु होती. गाडीच्या एकेका डब्यामध्ये सुमारे ६५ ते ७० हजार लिटर एचएसडी (युरो ४) हे इंधन असल्याची लेबल्स लावण्यात आली होती.