संचारबंदीमुळे अनेकांची व्यसनमुक्तीकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 10:03 PM2020-04-23T22:03:17+5:302020-04-24T00:16:47+5:30

नाशिक : कोरोनाच्या संचारबंदीमुळे अनेकांनी आपल्या व्यसनांवर नियंत्रण मिळविले असल्याचे दिसून येत असून काळ्या बाजारातून एवढ्या महागाने वस्तू खरेदी करून क्षणिक समाधान मिळविण्यापेक्षा ते न केलेलेच बरे असा विचार अनेकांनी सुरू केला असून, गप्प राहणे पसंत केले आहे.

 Due to the curfew, many are moving towards de-addiction | संचारबंदीमुळे अनेकांची व्यसनमुक्तीकडे वाटचाल

संचारबंदीमुळे अनेकांची व्यसनमुक्तीकडे वाटचाल

googlenewsNext

नाशिक : कोरोनाच्या संचारबंदीमुळे अनेकांनी आपल्या व्यसनांवर नियंत्रण मिळविले असल्याचे दिसून येत असून काळ्या बाजारातून एवढ्या महागाने वस्तू खरेदी करून क्षणिक समाधान मिळविण्यापेक्षा ते न केलेलेच बरे असा विचार अनेकांनी सुरू केला असून, गप्प राहणे पसंत केले आहे.
मागील सुमारे महिनाभरापासून जिल्ह्यात संचारबंदी सुरू आहे. सुरु वातीचे काही दिवस बरे वाटत असले तरी आता मात्र त्याची तीव्रता जानवू लागली आहे. बाजारात अनेक वस्तुंचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी या वस्तुंचा काळा बाजार सुरू आहे. छापील किमतीपेक्षा चौपट दराने या वस्तूंची विक्र ी केली जात आहे. या वस्तू जीवनावशक नसल्याने कुणी त्याची तक्र ार करत नाही. दहा रुपयाना मिळणारी तंबाखूची पुडी ४० रुपयांस, तर जादा विक्र ी न होणारी ५ ते ८ रुपयांची पूडी १५ ते २० रुपयांना विकली जात आहे. अधिकृत मद्य विक्रीची दुकाने सध्या बंद आहेत. यामुळे अनधिकृत मद्यविक्रीला ऊत आला आहे. १३० ते १६० रुपयांना मिळणारी विदेशी मद्याची बाटली चक्क ५०० ते ५५० रुपयांना विकली जात असल्याची चर्चा आहे. ८० ते १०० रुपयांना मिळणारी देशी मद्याची बाटली ३०० ते ३५० रुपयांपर्यंत विकली जात असल्याचे बोलले जात आहे.
हाताला काम नाही, पुढे काम मिळेल की नाही याची शास्वती नाही. थकलेला पगार मिळेलच याची खात्री नाही. यामुळे हाती असलेला पैसा व्यसनावर खर्च करण्यापेक्षा तो पुरु न पुरवून वापरण्यातच अनेकांनी धन्यता मानली आहे. अनेकजण गेल्या काही दिवसांपासून आशा वस्तूंची खरेदी टाळत आहेत. परिणामी अनेकजण व्यसनापासून दूर जाऊ लागले आहेत. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. कोरोनामुळे घरातील कर्त्यापुरु षांचे व्यसन सुटत असल्याने घरातील गृहिणींच्या चेहऱ्यावर वेगळेच समाधान दिसत आहे.

Web Title:  Due to the curfew, many are moving towards de-addiction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक