इगतपुरीत तलावात बुडुन एकाच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 07:38 PM2018-09-04T19:38:26+5:302018-09-04T19:38:50+5:30
शहरातील रेल्वे तलावात पोहत असतांना एका इसमाचा बुडुन मृत्यु झाला. वास्तविक या तलावात पोहण्यासाठी परवानगी नाही. मात्र रेल्वे प्रशासन व रेल्वे सुरक्षा बलाच्या दुर्लक्षामुळे या ठीकाणी सुरक्षा रक्षक नसल्याने या तलावात अनेक नागरीकांचे प्राण गेले आहेत.
इगतपुरी : शहरातील रेल्वे तलावात पोहत असतांना एका इसमाचा बुडुन मृत्यु झाला. वास्तविक या तलावात पोहण्यासाठी परवानगी नाही. मात्र रेल्वे प्रशासन व रेल्वे सुरक्षा बलाच्या दुर्लक्षामुळे या ठीकाणी सुरक्षा रक्षक नसल्याने या तलावात अनेक नागरीकांचे प्राण गेले आहेत.
या बाबत सविस्तर माहीती अशी बुधवारी ( दि. ४ ) रोजी सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास शहरातील कीरण जनार्दन जव्हारकर ( ६५ ) नेहमी प्रमाणे पोहण्यासाठी शहरातील रेल्वे तलावर गेले होते. पोहत असतांना त्यांचा बुडुन मृत्यु झाला. या पूर्वीही या तलावात अनेक जन मृत्युमुखी पडले आहेत . अनेक लोकांनी या तलावात आत्महत्या केल्या आहेत. रेल्वे तलावाच्या सुरक्षेची जबाबदारी रेल्वेच्या आय .डब्ल्यू . या विभागाची असताना त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडल्याची चर्चा शहरात सुरू आहे. या तलावाद्वारे रेल्वे कॉलनी, रेल्वे स्थानक, रेल्वे रु ग्णालय या मुख्य ठिकाणी रोज पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असल्याने रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने या तलावाच्या सुरक्षेविषयी लक्ष देणे आवश्यक आहे. पोलीसांनी पंचनामा करून कीरण जहारकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रु ग्णालयात पाठवला असुन इगतपुरी पोलीस ठाण्यात आकिस्मत मृत्युची नोंद करण्यात आली आहे. या बाबत अधिक तपास सुरु आहे.