पाण्यात बुडून दोघा सख्ख्या बहिणींचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 01:36 AM2018-03-25T01:36:33+5:302018-03-25T01:36:33+5:30
तालुक्यातील देवघट येथील पीरबाबा मंदिराजवळील कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या नेहा संतोष अहिरे (१०) व भूमिका संतोष अहिरे (७) या दोन सख्ख्या बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. खुशी रवींद्र अहिरे (७) या मुलीला वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले आहे.
मालेगाव : तालुक्यातील देवघट येथील पीरबाबा मंदिराजवळील कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या नेहा संतोष अहिरे (१०) व भूमिका संतोष अहिरे (७) या दोन सख्ख्या बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. खुशी रवींद्र अहिरे (७) या मुलीला वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले आहे. शनिवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. देवघट येथील संतोष सुकदेव अहिरे यांची चौथीत शिकणारी नेहा, पहिलीत शिकणारी भूमिका व खुशी अहिरे या शाळा सुटल्यावर पीरबाबा मंदिर परिसरातील कालव्यात पोहण्यासाठी गेल्या होत्या. पोहत असताना नेहा व भूमिका या सख्ख्या बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर बुडत असलेल्या खुशीला मासेमारी करणाऱ्यांनी व ग्रामस्थांनी पाण्याबाहेर काढल्याने ती सुखरूप बचावली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार सुभाष चव्हाण हे करीत आहेत.