गिरणाच्या महापुरामुळे नदीकाठची शेती पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 05:44 PM2019-08-05T17:44:08+5:302019-08-05T17:44:29+5:30
पिकांचे मोठे नुकसान, मक्याचे पीक पाण्याखाली
देवळा : गेल्या तीन-चार दिवसांपासून कळवण,सुरगाणा तालुक्यात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे देवळा तालुक्यात गिरणा नदीला आलेल्या महापुरामुळे नदी काठावरील विठेवाडी,भऊर आदी गावातील शेतांमध्ये उभी पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
भउर, विठेवाडी शिवारातील शिव रस्त्यालगत असलेल्या १० ते १५ एकर क्षेत्रामध्ये महापुराचे पाणी शिरल्यामुळे संपूर्ण मक्याचे पिक, विहीरी तसेच विठेवाडी ग्रामपंचायतीची पाणी पुरवठ्याची विहीर तसेच पंप हाउस पाण्यात बुडाले आहे. भउर येथील नानाजी पवार,अभिमन पवार , विठेवाडी येथील फुला जाधव, कुबेर जाधव, दीनकर जाधव, मोठाभाऊ जाधव आदी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ३ ते ४ फुट पाणी असून उभे मक्याचे पीक पाण्याखाली आहे.