हमीपत्राची विचारणा करताच घासलेटच्या मागणीत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 11:30 PM2018-11-14T23:30:12+5:302018-11-15T00:11:18+5:30
एकेकाळी लाखो लिटर घासलेट लागणाऱ्या जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांपासून घासलेट वापराचे प्रमाण कमालीचे घटले असून, त्यात पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत सुमारे दीड लाख नागरिकांना गॅस सिलिंडर वाटप करण्यात आले,
नाशिक : एकेकाळी लाखो लिटर घासलेट लागणाऱ्या जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांपासून घासलेट वापराचे प्रमाण कमालीचे घटले असून, त्यात पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत सुमारे दीड लाख नागरिकांना गॅस सिलिंडर वाटप करण्यात आले, तर घासलेट वापरणाºयांकडून हमीपत्र घेण्यास सुरुवात केल्यामुळे घासलेट वापरण्यास नागरिकांनी नकार दिला आहे.
गेल्या महिन्याच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये २०४ केएल म्हणजेच दोन लाख चार हजार लिटर घासलेटचा कोटा मंजूर झाला असून, आॅक्टोबरमध्ये हेच प्रमाण दोन लाख ६४ हजार इतके होते. एका महिन्यात ६० हजार लिटरने घासलेटचा कोटा कमी झाला आहे. सध्या लाभार्थ्यांकडून रेशन दुकानदार गॅस सिलिंडर नसल्याचे हमीपत्र भरून घेत आहेत. त्यामुळे अनेक गॅसधारकांकडून घासलेटचाही दुहेरी वापर करणाºयांपुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत. जिल्ह्यात गेल्या वर्षभरात एक लाख ४६ हजार नागरिकांना पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस सिलिंडरची जोडणी देण्यात आली असून, त्यामुळेही घासलेटची मागणी कमी झाल्याचे मानले जात आहे. यापूर्वी मालेगाव ग्रामीण, नाशिक तालुका, सिन्नर, दिंडोरी या तालुक्यांतून घासलेटची मागणी शून्य नोंदवून चूल बंद करण्यात आली आहे.