आगरटाकळी येथील समर्थ रामदास स्वामी मठात दासनवमीनिमित्त दर्शनासाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 12:38 AM2018-02-10T00:38:38+5:302018-02-10T00:39:59+5:30
उपनगर : आगरटाकळी येथील समर्थ रामदास स्वामी मठात दासनवमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम व प्रवचन उत्साहात पार पडले. दासनवमीनिमित्त दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
उपनगर : आगरटाकळी येथील समर्थ रामदास स्वामी मठात दासनवमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम व प्रवचन उत्साहात पार पडले. दासनवमीनिमित्त दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. श्री रामदास स्वामी मठात दासनवमीनिमित्त शुक्रवारी सकाळी सकाळी सहा वाजता श्री समर्थांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून समर्थांनी स्थापित केलेल्या गोमेय हनुमानाची महापूजा, आरती व अभिषेक विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष व जिल्हा न्यायाधीश एस. टी. पाण्डेय यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मंदिराचे विश्वस्त सुधीर शिरवाडकर, जोतिराव खैरनार, दिलीप कैचे, प्रकाश पवार, विजया माहेश्वरी, नगरसेवक राहुल दिवे, अनिल ताजनपुरे, सुषमा पगारे, आशा तडवी आदिंसह भाविक उपस्थित होते. सकाळी ९ वाजता डॉ. वसंत कवीश्वर, संगीता इनामदार यांचे प्रवचन, विजयाताई भट यांचा भक्तिसंगीताचा कार्यक्रम, स्वराली जोगळेकर, ऋतुजा नाशिककर यांचे गीत दासायन यांसह विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. दासनवमीनिमित्त मठावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.