आवक घटल्याने बाजारभाव वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 02:10 AM2018-06-06T02:10:52+5:302018-06-06T02:10:52+5:30
पंचवटी : गेल्या पाच दिवसांपासून शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकºयांच्या विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या संपाचा मंगळवारी नाशिक बाजार समितीत परिणाम जाणवला. मंगळवारी बाजार समिती बंद असल्याच्या अफवेमुळे शेतकºयांनी सोमवारच्या तुलनेत विक्रीला आलेल्या शेतमालापेक्षा निम्म्याने आवक झाल्याने फळभाज्यांच्या दरात २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे भाजीपाला व्यापाºयांनी सांगितले.

सोमवारी बाजार समितीत भरपूर आवक झाल्याने बाजारभाव स्थिर होते. शेतकरी संघटनेच्या वतीने १ जूनपासून सुरू करण्यात आलेला संप येत्या दोन दिवसात आणखी तीव्र होणार असल्याची अफवा सध्या बाजार समिती व शेतकरी वर्गात पसरल्याने भयभीत झालेल्या शेतकºयांनी मंगळवारी कमी प्रमाणात फळभाज्या माल विक्रीसाठी आणलेला होता. त्यामुळे कमी आवक झाल्याने मंगळवारच्या दिवशी बाजारभाव कडाडले होते.