दुष्काळाची छाया दाट, जनावरांना बाजाराची वाट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 05:49 PM2019-02-06T17:49:31+5:302019-02-06T17:49:43+5:30

पाटोदा : कधी नव्हे इतकी भीषण दुष्काळी परिस्थिती येवला तालुक्यात निर्माण झाल्याने जनावरांच्या चाºयाबरोबरच पाणी प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

Due to drought, cattle waiting for the market! | दुष्काळाची छाया दाट, जनावरांना बाजाराची वाट!

दुष्काळाची छाया दाट, जनावरांना बाजाराची वाट!

Next

पाटोदा : कधी नव्हे इतकी भीषण दुष्काळी परिस्थिती येवला तालुक्यात निर्माण झाल्याने जनावरांच्या चाºयाबरोबरच पाणी प्रश्नही ऐरणीवर आला आहे. चाºयाचे भाव गगनाला भिडल्याने पशुधन सांभाळणेही जिकिरीचे बनले आहे. त्यामुळे नाईलाजास्तव चारा-पाण्याअभावी जीवापाड जपलेल्या जनावरांना बाजाराची वाट दाखवावी लागत असून त्यांची कवडीमोल भावात विक्र ी होत असल्याचे भयावह चित्र येवला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत भरणाºया जनावरांच्या आठवडे बाजारात पहावयास मिळत आहे.
येवला तालुक्यातील आठवडे बाजारात जनावरे विक्र ीचा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे. आठवडे बाजारापेक्षाही जनावरांना कसायाच्या दावणीला बांधीत असल्याचेही भयानक स्थिती आहे. दुष्काळ आणि येवला तालुका हे समीकरणच झाले आहे. दुष्काळी परिस्थिती असल्याने चारा पाण्याआभावी दुभत्या जनावरांचे संगोपन करणे अवघड झाले आहे. येवला तालुक्यात आजमितीस ४७ गावे व २९ वाड्यांना टॅँकरने पिण्याचे पाणी पुरविले जात असून दररोज पाणी मागणाºया गावांची संख्या वाढतच आहे. जेथे माणसांनाच पिण्यासाठी पाणी उपलब्ध करणे अवघड बनले आहे, त्याठिकाणी जनावरे पोसणेही कठीण झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी हवालिदल झाला आहे.

Web Title: Due to drought, cattle waiting for the market!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी