नगरसूलच्या भैरवनाथ यात्रेवर दुष्काळाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 07:00 PM2019-04-26T19:00:21+5:302019-04-26T19:01:03+5:30

नगरसुल : येथील नांदगाव थोरात वस्ती वरील पुरातन कालभैरवनाथ यात्रा उत्साहात साजरी झाली. या मंदिरातील मूर्ती पुरातन असून पुजारी डवले कुटुंबाचा मान आहे . सालाबादप्रमाणे याही वर्षी यात्रा भरली मात्र यंदाच्या यात्रेवर दुष्काळाचे सावट दिसून आले.

 Due to drought in the city's Bhairavnath yatra | नगरसूलच्या भैरवनाथ यात्रेवर दुष्काळाचे सावट

नगरसूलच्या भैरवनाथ यात्रेवर दुष्काळाचे सावट

Next

भैरवनाथ यात्रेच्या आदल्या दिवशी कोपरगाव येथून गोदावरी गंगेचे पाणी कावड्यांनी आणून नगरसुल गावाच्या वेशीत ठवले. यात्रेच्या दिवशी सकाळी ९ वाजता भैरवनाथ महाराज मुखवटा पालखी, काठी व कावड्यांची मिरवणूक डीजे व डफाच्या निनादात तसेच फटाक्यांची आतषबाजीत चौकाचौकातून काढण्यात आली. सकाळी १० ते १०.३० वाजता देवाला निकेत पाटील यांच्या व कावडीचे मानकरी रवि पैठणकर यांच्या हस्ते जलाभिषेक करण्यात आला. सकाळी ११ वाजता महापुजा करण्यात आली. त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने दरवर्षी होणारा लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्र म व कुस्ती दंगल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला . यात्रा कमेटी अध्यक्ष दिपक पैठणकर, उपाध्यक्ष दिपक कुडके, सचिव बलराम कुडके, सदस्य रविंद्र पैठणकर, अभिषेक कुडके, कुनाल भगत, संजय कुडके, मच्छींद्र कुडके, सुमती पैठणकर, नितीन भगत, अण्णा भगत, निखिल थोरात, विकास कुडके, श्रीराम डवले, ओमकार जाधव, पाणी भगत, संजय मेहतर व मंदिराचे मुख्य पुजारी गणपत डवले यांनी यात्रोत्सवासाठी परिश्रम घेतले.

 

Web Title:  Due to drought in the city's Bhairavnath yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.