जंगलतोडीमुळेच दुष्काळाचे सावट

By admin | Published: April 24, 2017 01:20 AM2017-04-24T01:20:57+5:302017-04-24T01:21:08+5:30

कनाशी : जंगलतोडीमुळेच पर्जन्यमान घटले असून, दुष्काळाचा सामना करावा लागत आहे, असे प्रतिपादन उपवनसंरक्षक रामानुजम यांनी केले.

Due to drought, due to drought | जंगलतोडीमुळेच दुष्काळाचे सावट

जंगलतोडीमुळेच दुष्काळाचे सावट

Next

कनाशी : जंगलतोडीमुळेच पर्जन्यमान घटले असून, दुष्काळाचा सामना करावा लागत आहे, असे प्रतिपादन उपवनसंरक्षक रामानुजम यांनी केले.
कळवण तालुक्यातील वनपरिक्षेत्र कार्यालय कनाशी व रंजना सोशियल वेल्फेअर या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जागतिक वसुंधरा दिन शिंगाशी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
जागतिक वसुंधरा दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपवनसंरक्षक रामानुजम होते. प्रमुख पाहुणे म्हणून सहा. वनसंरक्षक सुजित नेवासे (रोहयो, सुरगाणा), वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल आडे, माजी वनपरिमंडळ अधिकारी तुळशीदास बैरागी, कळवण पंचायत समितीचे उपसभापती विजय शिरसाठ, रंजना सोशियल वेल्फेअरच्या अध्यक्ष रंजना बैरागी आदी मान्यवर उपस्थित होते.
निसर्गचक्र बदलत असल्याची ओरड केली जाते. पावसाळ्यात पाऊस गायब होत असल्यामुळे दुष्काळ ढाण मांडत असल्याचे उपवनसंरक्षक रामानुजम यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Due to drought, due to drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.