दुष्काळाचे सावट मात्र शेतकऱ्यांमध्ये पोळ्याचा उत्साह कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 01:26 AM2018-09-10T01:26:19+5:302018-09-10T01:27:05+5:30

Due to drought, only the enthusiasm of farmers in the farmers | दुष्काळाचे सावट मात्र शेतकऱ्यांमध्ये पोळ्याचा उत्साह कायम

दुष्काळाचे सावट मात्र शेतकऱ्यांमध्ये पोळ्याचा उत्साह कायम

googlenewsNext

मुंजवाड : दुष्काळाचे सावट असतानाही बळीराजाने कंजुसी न करता उत्साहात वाजतगाजत सर्जा राजाची मिरवणुक काढूने पोळा सण साजरा केला. मुंजवाडसह परिसरात या वर्षी समाधानकारक पाऊस नसल्याने पोळा सणावर दुष्काळाचे सावट असुनही बळीराजाने वर्षभर शेतात राबणाºया सर्जा - राजाची सजावट करण्यात कमी केली नाही. अंगावर झुला, गळयात घुंगरांच्या माळा, गोंडे, पायात घुंगरांचे चाळ, शिंगांना फुगे आणि विवीध रंगांची पाठीवर नक्षी काढून सर्जा -राजाला सजविण्यात आले होते. पाडगण शिवार, वेताळवाडी, मल्हारवाडी शिवारातुनही वाजत गाजत गावातुन मिरवणुक काढण्यात आली.
वणी : शेतकºयांनी बैलांना अंघोळ घालून विविध प्रकारची सजावट करून विधिवत पूजन केले. जगदंबा देवी मंदिर परिसरातील हनुमान मंदिरासमोर तसेच हनुमान मंदिरासमोर बैलांनी सलामी दिली. तद्नंतर पुरणपोळीचा नैवेद्य बैलांना दाखविण्यात आला.
ताहाराबाद : बागलाण तालुक्यातील मोसम परिसरात बैलपोळा पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. देवठाणदिगर येथे सरपंच चुनीलाल ठाकरे यांच्या हस्ते मारुती मंदिराजवळ बैलांचे पूजन करून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. दुपारपासून बैल सजविण्यासाठी शेतकरीवर्गाची मोठी लगबग सुरू होती.
मानोरी : परिसरात साध्या स्वरूपात पार पडला. मागील काही वर्षांपासून बळीराजाच्या शेतमालाला भाव मिळत नाही. यंदा बैलपोळाही साध्या स्वरूपात साजरा केला.
डांगसौदाणे : चालू वर्षी शेती पिकांचे कोसळलेले भाव व पावसाचे अत्यल्प प्रमाण यांमुळे निराशेच्या गर्तेत असलेल्या बळीराजाकडून बैलपोळा सणाबाबत अनुत्सुकता दिसत होती, सर्जा राजा बाबत कृतज्ञता दाखवत पुरळपोळी गोड नैवेद्य दाखिवण्यासाठी बळीराजा उत्साहीत दिसला.


सकाळ पासुनच बळीराजाकडून बैलपोळयाची जोरात तयारी दिसली.

सकाळी सकाळी बळीराजाकडून नदीवर बैल धुण्यासाठी गर्दी झाली होती. दुपार पर्यंत बैलांना पोटभर वैरण दिल्यानंतर संपुर्ण गावभर बैलांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.नंतर बळीराजाने आपल्या सर्जा राजाला ओवाळून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य व धान्य भरवून त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

Web Title: Due to drought, only the enthusiasm of farmers in the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.