तळवाडे परिसरात दुष्काळाची तहसीलदारांकडून पहाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 05:58 PM2018-10-17T17:58:36+5:302018-10-17T17:59:14+5:30

सायखेडा : निफाड ,सिन्नर तालुक्याच्या सरहद्दीवरील तळवाडे,महाजनपुर, भेंडाळी, औरंगपूर,बागलवाडी या गावात भीषण दुष्काळ परिस्थितीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन, मका ,भाजीपाला, ऊस यासह इतर सर्व बागायती पिके पाण्याअभावी करपून गेल्याने करपलेल्या पिकांची पहाणी निफाडचे तहसीलदार दीपक पाटील यासह कृषी अधिकारी, सर्कल तलाठी यांनी केली

Due to drought, see tahsildars | तळवाडे परिसरात दुष्काळाची तहसीलदारांकडून पहाणी

तळवाडे येथे करपलेल्या पिकांची पहाणी करतांना तहसीलदार दीपक पाटील व इतर.

Next
ठळक मुद्दे तहसीलदार दीपक पाटील यांनी प्रत्यक्ष पहाणी करून जिल्हा स्तरावर अहवाल देणार

सायखेडा : निफाड ,सिन्नर तालुक्याच्या सरहद्दीवरील तळवाडे,महाजनपुर, भेंडाळी, औरंगपूर,बागलवाडी या गावात भीषण दुष्काळ परिस्थितीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन, मका ,भाजीपाला, ऊस यासह इतर सर्व बागायती पिके पाण्याअभावी करपून गेल्याने करपलेल्या पिकांची पहाणी निफाडचे तहसीलदार दीपक पाटील यासह कृषी अधिकारी, सर्कल तलाठी यांनी केली
जून मिहन्यात जेमतेम पाऊस झाल्याने शेतकर्यांनी शेतात खरीप हंगामातील पिकांची पेरणी केली तीन मिहने उलटूनही पाऊस पडला नाही परतीच्या पावसाने पाठ फिरवली त्यामुळे जून मिहन्यात पेरणी केलेली पिके पूर्णपणे करपून गेली शेताच्या मशागतीपासून ते पिकाचे बियाणे, खुरपणी यासाठी हजारो रु पये शेतकर्यांचे वाया गेले कोणताही आर्थिक फायदा होणार नाही पिके करपली, जनावरांचा चारा वाळून खाक झाला, पाऊसच पडलेला नसल्याने विहिरींना पाणी आले नाही त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शेतात राहणार्या नागरिकांना कुपनलिकेचे पाणी येत नाही त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आत्ताच कठीण झाला असल्याने भयानक दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत निफाड तालुक्याच्या गोदाकाठ भागातुन गोदावरी नदी वहात असली तरी सीमेवर या नदीच्या पाण्याचा कोणताही फायदा होत नाही त्यामुळे या गावत लवकर दुष्काळाच्या झळा पोहचत आहे. या भागातील पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सरपंच लता सांगळे, सोपान खालकर यांनी दैनिक लोकमतच्या माध्यमातून बातमीद्वारे केली होती. प्रशासनाने दखल घेत तहसीलदार दीपक पाटील यांनी प्रत्यक्ष पहाणी करून जिल्हा स्तरावर अहवाल देणार आहे. राज्य स्तरीय पथक लवकरच पहाणी करून शासनाला अहवाल सादर करणार आहे यावेळी भीषण दुष्काळ असल्याचे स्पष्ट दिसून आले यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य सुरेश कमानकर,सोपान खालकर, सरपंच लता सांगळे,बचवन्त फड,दीपक कमानकर, ग्रामसेवक रहाणे,खाटेकर, तलाठी भोई, राजेंद्र सांगळे यासह शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Due to drought, see tahsildars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.