निर्यातबंदीमुळे शेतकरी वर्ग आर्थिक दरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 06:49 PM2020-09-21T18:49:12+5:302020-09-21T18:49:58+5:30
लखमापूर : कांदा निर्यातबंदी करून शेतकरीवर्ग आर्थिक दरीत लोटला गेला असून जगाचा पोशिंदा बळीराजा आधाराविना रस्त्यावर उतरला असून, शेतकरीवर्गाचे अश्रू कोण पुसणार? असा सवाल निर्माण झाला आहे.
लखमापूर : कांदा निर्यातबंदी करून शेतकरीवर्ग आर्थिक दरीत लोटला गेला असून जगाचा पोशिंदा बळीराजा आधाराविना रस्त्यावर उतरला असून, शेतकरीवर्गाचे अश्रू कोण पुसणार? असा सवाल निर्माण झाला आहे.
रब्बी व खरीप हंगामात आर्थिक फटका बसलेल्या बळीराजाला आता तरी सुगीचे दिवस येतील असे वातावरण जवळ जवळ तयार झाले असताना एका घोषणेने त्यावर पाणी फिरले. बदलत्या हवामानातील पिकांवर होणार परिणाम, पिके वाचिवण्यासाठी शेतकरी वर्गाची धावपळ, भांडवलाची कमतरता, भांडवल जास्त व उत्पन्नाची आवक कमी हे समीकरण आदी संकटातून पिकांना वाचविण्यासाठी शेतकरी जिवाचे रान करीत असताना सरकारने कांद्यावर निर्यातबंदी करून बळीराजाला चारी मुंड्या चित केले आहे. अगोदरचं कोरोनाचे वातावरण त्यात जवळ पुरेसे भांडवल नाही. याही परिस्थिती मिळेल त्या ठिकाणाहून कर्ज घेऊन भांडवल उपलब्ध करण्यावर भर दिला. परंतु लॉक डाऊनची स्थिती असल्यामुळे बियाने व रोपे मिळवण्यासाठी शेतकरीवर्गाला तारे वरची कसरत करावी लागली. बुकिंग करून ही बियाने व रोपे मिळत नसल्याने शेतकरी वर्गाच्या भुवया उंचावल्या गेल्या असतांना सरकारने हा निर्णय घेऊन खरीप हंगामातील आशेवर अवकृपाच केली आहे.
जवळचे सर्व भांडवल खर्च करून कसे तरी खरिपातील पिकं घेतली. परंतु पावसाचा लहरीपणा तसेच वातावरणातील बदलावाचा पिकांना वेगवेगळ्या स्वरूपाच्या रोगाचा सामना करावा लागला व त्यात बरीच पिकाच्या उत्पन्न वाढीवर मोठ्या प्रमाणात फटका बसला. रब्बी हंगामात व कोरोना काळात वाया गेलेले भांडवल भरून काढण्यासाठी मिळेल त्या ठिकाणी कांदा साठवून ठेवला. परंतु अति पावसाने साठवून ठेवलेला कांदा पिकाला मोड व मोठ्या प्रमाणात सडण्याचे प्रमाण वाढल्याने कांदा पिकावरील सर्व आशेवर पाणी फिरले. तसेच पावसाने कांदा पिकाचे नुकसान झाल्याने कांदा पिकाला बाजारपेठेत चांगली मागणी आली व आता कांदा अत्यंत कमी प्रमाणात पाहायला मिळत असताना कांदा निर्यातबंदी केल्याने शेतकरीवर्ग पूर्णपणे हतबल झाला आहे.
कांदावरील निर्यातबंदी तत्काळ उठवावी
आम्ही मोठ्या मेहनतीने कष्ट करून तसेच अनेक समस्यांचा सामना करून थोडा फार कांदा जतन करून ठेवला होता व रब्बी, तसेच कोरोना काळातील वाया गेलेले भांडवल भरून निघेल, अशी आशा निर्माण झाली होती. कारणं बाजारपेठेत आवक कमी व मागणी जास्त हे समीकरण झाल्याने सध्या चांगला भाव मिळत असताना सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी घोषित केल्याने आमचे पूर्णपणे जीवन उधळून गेले आहे. तरी कांदावरील निर्यातबंदी तत्काळ उठवावी ही मागणी जोर धरीत आहे.