येवला तालुक्यात दुष्काळाची तीव्रता गडद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 06:27 PM2019-03-09T18:27:10+5:302019-03-09T18:27:26+5:30
दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांना आपली स्वत:ची जनावरे चाऱ्याअभावी दुरापास्त होत चालली असून, दररोज नित्यनेमाने जनावरांना हिरवा चारा महागड्या दराने उपलब्ध करून जनावरे सांभाळण्याची नामुष्की शेतकरीवर्गावर ओढवत आहे. त्यात गत एक महिन्यापासून उष्णता अचानक प्रचंड वाढ झाल्याने जनावरांना तापासारख्या भयंकर आजारांना सामोरे जावे लागत आहे.
मानोरी : दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांना आपली स्वत:ची जनावरे चाऱ्याअभावी दुरापास्त होत चालली असून, दररोज नित्यनेमाने जनावरांना हिरवा चारा महागड्या दराने उपलब्ध करून जनावरे सांभाळण्याची नामुष्की शेतकरीवर्गावर ओढवत आहे. त्यात गत एक महिन्यापासून उष्णता अचानक प्रचंड वाढ झाल्याने जनावरांना तापासारख्या भयंकर आजारांना सामोरे जावे लागत आहे. दुष्काळाची घोषणा करून तीन महिने उलटले असूनही घोषणा केवळ तीन महिन्यांनंतर ही कागदावरच रेंगाळलेली असल्याने दुष्काळाची केवळ घोषणा नको तर प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याची मागणी होत असून, यात जनावरांच्या चारा छावण्या सुरू करण्याची मागणी शेतकरीवर्गाकडून होत आहे.
तसेच डोंगराळ भागातील प्राण्यांनादेखील पिण्यासाठी पाणी नसल्याने मागील पंधरा ते वीस दिवसांपासून येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक परिसरात हरणांचे कळप, मोरांचे कळप, वानर, विविध प्रकारच्या पक्ष्यांचे कळप तसेच करकोचा नावाचे तब्बल १५०हून अधिक पक्ष्यांचे जाळे हरभरा पिकाच्या शेतात हिरवा हरभरा झाड खात असल्याचे दिसून आले आहे. करकोचे नावाचे पक्ष्यांचे हे भयाण जाळे बघण्यासाठी रस्त्याने जाणाºया वाहनचालकांना हा मनमोहक क्षण बघण्यासाठी आतुरतेने गाडी थांबून पाहत असतात.
पुढच्या काही दिवसात उन्हाची तीव्रता अधिकच राहण्याची शक्यता असल्याने वन्यजीव प्राण्यांचे मोठे हाल होणार असल्याने वन्यप्राणी, पक्षी ग्रामीण भागात मानवी वस्तीकडे धाव घेऊन अन्नाच्या शोधात विसावलेले असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातदेखील अपुºया पावसामुळे हिरवा चारा अल्पशा प्रमाणात असल्याने घरच्या गाईना हा चारा अपुरा पडत असल्याने वन्यप्राण्यांना हिरवा चारा शोधणे कठीण होणार आहे. शासनाने दुष्काळ जाहीर करून दोन महिने उलटून ही चारा छावण्या सुरू झालेल्या नसून परिणामी जनावरे स्वस्तात विकण्याची वेळ तर शेतकऱ्यांवर येणार नाही ना असा प्रश्न दुग्ध व्यावसायिक उपस्थित करत आहे.
दरवर्षी पाऊस पडल्यावर मानोरी परिसरात हिरवा चारा, गवत खाण्यासाठी पडीत जनावरे मोठी गर्दी करत असल्याचे दिसून येत होते. परंतु यंदा हीच अवस्था बिकट झालेली असून, जनावरे चाºयाच्या शोधात पडीत जागेवरसुद्धा गवत मिळणे दुरापास्त झाल्याने महागडी जनावरे रास्त दराने विकण्याची परिस्थिती शेतकºयांवर ओढवली आहे.