सिन्नर-शिर्डी चौपदरीकरणामुळे वावीची बाजारपेठ उध्दवस्त होण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 05:40 PM2019-07-18T17:40:51+5:302019-07-18T17:41:06+5:30
वावी : सिन्नर-शिर्डी रस्त्याच्या चौपदरीकरणामुळे महामार्गावरील वावी गावातील बाजारपेठ उध्दवस्त होण्याची भीती निर्माण झाल्याने व्यापारी व ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली असून आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. याबाबत जिल्हाधिकाºयासह संबंधितांना निवेदन देण्यात आले आहे.
वावी : सिन्नर-शिर्डी रस्त्याच्या चौपदरीकरणामुळे महामार्गावरील वावी गावातील बाजारपेठ उध्दवस्त होण्याची भीती निर्माण झाल्याने व्यापारी व ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली असून आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. याबाबत जिल्हाधिकाºयासह संबंधितांना निवेदन देण्यात आले आहे.
सिन्नर-शिर्डी राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम प्रस्तावित असून या कामासाठी वावी गावाजवळ काही दिवसांपूर्वी मोजणी करण्यात आली होती. त्याला ग्रामस्थांनी विरोध केल्यानंतर गावाजवळ बाजारपेठ उध्वस्त होणार नाही असे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले होते. तथापि, नवीन आराखड्यानुसार हमरस्त्यावरील बाजारपेठ संपूर्ण उध्वस्त होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. त्यामुळे गावाजवळ चौपदरीकरणाच्या कामात रस्त्याची रूंदी कमी केली करून प्रस्तावित उड्डाणपूल रद्द करावा, अशी मागणीचे निवेदन ग्रामपंचायतीच्या ठरावासह भूसंपादन जिल्हाधिकारी कार्यालय, राष्ट्रीय महामार्ग कार्यालय, तहसीलदार कार्यालय, खासदार हेमंत गोडसे, आमदार राजाभाऊ वाजे यांना देण्यात आले. व्यापाºयांसह ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींची भेट घेऊन आपली कैफियत मांडली.
नवीन आराखड्यानुसार सिन्नर शिर्डी रस्त्यालगतचे बाजार समितीचे व्यापारी संकुल, पतसंस्था, दूध संस्था कार्यालय, अनेक छोटे-मोठ्या व्यवसायांवर संक्रांत येणार आहे. मागील ५५ ते ५५ वर्षांपासून सुरू असलेले व्यवसाय बंद होऊन उदरनिर्वाहाचे साधन जाणार असल्याने शेकडो कुटुंबांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात आली.