गणेश विसर्जनादरम्यान वालदेवीत बुडून महाविद्यालयीन युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 04:29 PM2018-09-24T16:29:24+5:302018-09-24T16:32:56+5:30
नाशिक : विल्होळीलगत असलेल्या वालदेवी धरणाच्या पुलाजवळ कुटुंबीयांसमवेत गणेशमूर्ती विसर्जनासाठी गेलेला महाविद्यालयीन युवक पाय घसरून पाण्यात पडला व गाळात अडकून त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि़२३) सायंकाळी घडली़ चेतन दिनकर बोराडे (२२, रा. नागरेनगर, सोनवणे मळा, चेतनानगर) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे़

पंचवटी कॉलेज आॅफ मॅनेजमेंट अॅण्ड कॉम्प्युटर सायन्स महाविद्यालयातील एसवायबीसीएसला शिक्षण घेत असलेला चेतन बोराडे हा रविवारी गणेश विसर्जनासाठी कुटुंबीयांसमवेत विल्होळीलगत असलेल्या वालदेवी धरणाच्या पुलाजवळ गेला होता. गणेश विसर्जन करीत असताना त्याचा पाय घसरला व तो पाण्यात पडला़ यावेळी पाण्यातील गाळात अडकल्याने त्याचा मृत्यू झाला़ ही बाब लक्षात येताच त्याचा तत्काळ शोध घेण्यात आला़ त्याचा शोध घेतल्यानंतर शशिकांत गोरडे यांनी त्यास तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ़ गायकवाड यांनी चेतन यास तपासून मयत घोषित केले़
मयत चेतनच्या पश्चात आई-वडील व विवाहित बहीण आहे़ मुलाच्या मृत्यूच्या धक्क्यामुळे आई-वीडलांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत़ दरम्यान, या घटनेची वाडीव-हे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़