गणेशोत्सवावर दुष्काळाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 04:41 PM2018-09-14T16:41:10+5:302018-09-14T16:41:17+5:30

कसबे सुकेणे: येथे व परिसरात यंदा अजूनही समाधान कारक पाऊस न झाल्याने यंदाच्या गणेशोउत्सवावर दुष्काळाचे सावट आहे .

 Due to Ganeshotsav drought | गणेशोत्सवावर दुष्काळाचे सावट

गणेशोत्सवावर दुष्काळाचे सावट

Next
ठळक मुद्देकसबे सुकेणे , मौजे , ओणे , थेरगाव, दात्याने, जिव्हाळे , दिक्षी शिरसगाव, कोकणगाव, पिंपळस रामाचे या भागात ढोल ताश्यांचा गजरात , विघ्नहर्त्या गणरायाचे स्वागत करण्यात आले- कसबे सुकेणे शहरात विविध सार्वजनिक मित्र मंडळांनी गणेशाची स्थापना केली आहे .


कसबे सुकेणे: येथे व परिसरात यंदा अजूनही समाधान कारक पाऊस न झाल्याने यंदाच्या गणेशोउत्सवावर दुष्काळाचे सावट आहे .

गणरायाच्या स्वागतासाठी आज कसबे सुकेणे परिसरात उत्साह दिसला असला तरी कमी प्रजन्य मानाने चिंताग्रस्त शेतकऱ्यांच्या जल्लोषाला नाराजीची किनार होती- बाप्पा पावसाळयाच्या उत्तरार्ध भागात तरी बरस अशी आर्जव शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य जनतेने गणरायाला केली . बाजारपेठेत गणेश मूर्ती व पूजा विधी ,आकर्षक देशी व चिनी लायिटंग, मखर खरेदीसाठी गर्दी दिसली असली तरी यंदा वरु ण राजाची मेहेरबानी नसल्याने निरूउत्साह दिसून येत होता .कसबे सुकेणे शहरातील मेन रोड ,शिवाजी चौक, क्र ांती चौक , सोसायटी चौक, निसाका रोड ,कोकणगाव रस्ता आदी भागासह मौजे सुकेणे, ओणे , थेरगाव,दात्याणे,जिव्हाळे दिक्षी येथे ही बाप्पांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
 

Web Title:  Due to Ganeshotsav drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.