गोदावरी-कुंभमेळ्याविषयी भय्यू महाराजांना होती आस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 01:10 AM2018-06-13T01:10:38+5:302018-06-13T01:10:38+5:30

आध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांच्या अचानक झालेल्या मृत्यूने नाशिकमधील त्यांचा अनुयायांना धक्का बसला. नाशिकमध्ये भय्यूजी गुरुजी यांचा जाहीर प्रवचन किंवा अध्यात्मावर आधारित कार्यक्रम झाला नसला तरी त्यांचा नाशिकशी नेहमीच ऋणानुबंध राहिला आहे. गोदावरी स्वच्छता, कुंभमेळा, पौराणिक नाशिक अशा विविध विषयांवर गुरुजी नेहमी संवाद साधत असत.

 Due to the Godavari-Kumbh Mela, he had faith | गोदावरी-कुंभमेळ्याविषयी भय्यू महाराजांना होती आस्था

गोदावरी-कुंभमेळ्याविषयी भय्यू महाराजांना होती आस्था

Next

नाशिक : आध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांच्या अचानक झालेल्या मृत्यूने नाशिकमधील त्यांचा अनुयायांना धक्का बसला. नाशिकमध्ये भय्यूजी गुरुजी यांचा जाहीर प्रवचन किंवा अध्यात्मावर आधारित कार्यक्रम झाला नसला तरी त्यांचा नाशिकशी नेहमीच ऋणानुबंध राहिला आहे. गोदावरी स्वच्छता, कुंभमेळा, पौराणिक नाशिक अशा विविध विषयांवर गुरुजी नेहमी संवाद साधत असत. अध्यात्माचा प्रचार-प्रसार करणारे भय्यूजी महाराज यांनी आत्महत्त्या केल्याचे कळाल्यानंतर त्यांना मानणाऱ्या वर्गाला मानसिक धक्का बसला. भय्यूजी महाराज यांच्या आत्महत्येमागे कौटुंबिक तणावाचे कारण पुढे येत असले तरी ते ताणतणावावर सहज मात करू शकत होते आणि त्यांच्याजवळ अध्यात्माची मोठी ताकद होती; मात्र गुरुजींनी असे पाऊल कसे उचलले हे समजण्यापलीकडे असल्याचे त्यांचे नाशिकमधील निकटवर्तीयांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सुनील बागुल यांनी आठवणींना उजाळा देताना सांगितले, गुरुजी मला भेटल्यावर प्रथम गळाभेट घेत असे. त्यांच्या निधनाच्या वृत्तावर विश्वास बसणे अवघड झाले असून, हे फार मोठे व्यक्तिमत्त्व देशाने गमावले आहे. त्यांच्या निधनाने अध्यात्म क्षेत्रासह देशाचे मोठे नुकसान झाले आहे. नाशिकमध्ये आल्यावर ते भेट घेत मार्गदर्शन करीत असत. गरजवंताला मदत पोहोचवणे हे ते अध्यात्म मानत आणि हीच शिकवण त्यांनी दिल्याचे बागूल म्हणाले. दि. २३ मे रोजी अखेरची भेट महाराजांसोबत झाल्याचे नगरसेवक शिवाजी सहाणे यांनी सांगितले. पुण्यावरून ते कन्येला भेटून सिन्नरला आले होते. सुनील बागुल, करण गायकर यांच्यासोबत मी भेट घेतली होती. तेथील एका हॉटेलमध्ये तब्बल तीन तास आमच्यासोबत गुरुजींनी चर्चा केली होती.  गोदावरी संवर्धनाचे अभियान त्यांनी हाती घेतले होते. इतरांचे दु:ख जाणून घेणारा हा मोठ्या मनाचा माणूस इतका व्यथित होणे हे एक कोडे असल्याच्या भावना सहाणे यांनी व्यक्त केल्या. अण्णासाहेब जावळे-पाटील यांच्या निधनानंतर तरुणाईचा मुख्य मार्गदर्र्शक व आधारवड महाराज होते, असे छावा क्रांतिवीर सेनेचे करण गायकर यांनी सांगितले.

Web Title:  Due to the Godavari-Kumbh Mela, he had faith

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.