अवघा निफाड तालुका निघतोय भाजून रस्ते ओस : उष्म्यामुळे कूलर, पंख्यांना मागणी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 11:59 PM2018-05-08T23:59:59+5:302018-05-08T23:59:59+5:30
निफाड : सूर्यनारायणाने तालुक्याला भाजून काढले असून, सोमवारी कुंदेवाडी येथील हवामान केंद्रात ४० अंश सेल्सिअस इतक्या उच्चतपमानाची नोंद झाली.
निफाड : सूर्यनारायणाने तालुक्याला भाजून काढले असून, सोमवारी कुंदेवाडी येथील हवामान केंद्रात ४० अंश सेल्सिअस इतक्या उच्चतपमानाची नोंद झाली. गेल्या महिनाभरापासून निफाड तालुक्यात उष्म्याचे प्रमाण वाढत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दररोज सूर्यनारायण आग ओकत असल्याने दुपारच्या सुमारास तालुक्यातील रस्ते ओस पडत आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी दुपारी नागरिक घरात आराम करणे पसंत करीत आहे. घराबाहेर पडायचे असल्यास डोक्यावर टोपी, उपरणे वापरण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. कांद्याच्या चाळीवर काम करताना मजुरांना प्लॅस्टिक कापडाच्या आच्छादनाची सावली करून द्यावी लागत आहे. दुपारच्या वेळेस असलेल्या लग्नाना हजेरी लावताना प्रचंड उष्णतेने नागरिक प्रचंड हैराण होत आहे. उष्म्यामुळे कूलर, पंख्यांना मागणी वाढली आहे, तर थंड पेय, रसवंतिगृहात नागरिकांची गर्दी वाढत आहे. सोमवारी निफाड तालुक्याचे तपमान ४० अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. तालुक्यातील हे यावर्षीचे सर्वात उच्चतपमान असल्याचे स्थानिक हवामान केंद्राच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.