पांडाणेत पावसाच्या जोरदार हजेरीमुळे बळीराजा सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 05:40 PM2020-07-25T17:40:15+5:302020-07-25T17:40:37+5:30

पांडाणे : दिंडोरी तालुक्याला गेल्या १० ते १५ दिवसापासून विसावलेल्या पावसाने शनिवारी (दि.२५) दुपारी २ च्या सुमारास जोरदार हजेरी लावल्यामुळे बळीराजा सुखावला आहे.

Due to the heavy presence of rain in Pandane, Baliraja was relieved | पांडाणेत पावसाच्या जोरदार हजेरीमुळे बळीराजा सुखावला

पांडाणेत पावसाच्या जोरदार हजेरीमुळे बळीराजा सुखावला

googlenewsNext
ठळक मुद्देसप्तश्रृंगी गडावर अचानक ढग गोळा झाल्यानंतर पावसाला जोरदार सुरवात झाली.

लोकमत न्यूज नेटवर्क
पांडाणे : दिंडोरी तालुक्याला गेल्या १० ते १५ दिवसापासून विसावलेल्या पावसाने शनिवारी (दि.२५) दुपारी २ च्या सुमारास जोरदार हजेरी लावल्यामुळे बळीराजा सुखावला आहे.
दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी गडावर दुपारी पावसाला सुरवात झाल्यानंतर, वणी, मुळाणे, चंडीकापूर मांदाणे, तळेगाव, औताळे, कृष्णागाव, मावडी, खेडगाव, कोशिंबे, पुणेगाव, पांडाणे, अंबानेर, अहिवंतवाडी, चामदरी, गोलदरी, माळे दुमाला, काजी माळे, पिंपरखेड, टाक्याचापाडा, परिसरात सायंकाळी जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या भात लागवडीसाठी वेग येणार आहेत तसेच पावसाअभावी जी सोयाबिन व भुईमुग, मका पिकांना आज आलेल्या पावसामुळे जीवदान मिळाले आहे. शनिवारी सकाळपासून कडक उन असतांना सप्तश्रृंगी गडावर अचानक ढग गोळा झाल्यानंतर पावसाला जोरदार सुरवात झाली.
दरम्यान सोनजाब, तळेगाव, मावडी, सगंमनेर, कसबे वणीपासून दक्षिण भागात भात, नागली, वरी, उडीद, मुग, भुईमुंग, सोयाबीन पिक घेतले जात,े त्यासाठी रोहीणी नक्षत्रात भात व नागलीची रोपे पाण्याअभावी करपायला सुरवात झाली होती. परंतू अचानक आलेल्या पाऊसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे.

Web Title: Due to the heavy presence of rain in Pandane, Baliraja was relieved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.