मुसळधार पावसामुळे दिंडोरीमध्ये पूरस्थिती

By Admin | Published: August 2, 2016 12:06 PM2016-08-02T12:06:18+5:302016-08-02T12:23:15+5:30

दिंडोरी येथील वाघाड परिसरात 144 मिमी तर तालुक्यात सरासरी 100 मिमी विक्रमी पाऊस झाल्याने सर्व नदी नाल्यांना महापूर आला आहे.

Due to heavy rainfall, flooding in Dindori | मुसळधार पावसामुळे दिंडोरीमध्ये पूरस्थिती

मुसळधार पावसामुळे दिंडोरीमध्ये पूरस्थिती

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

दिंडोरी (नाशिक), दि. २ - तालुक्यातील वाघाड परिसरात 144 मिमी तर  तालुक्यात सरासरी 100 मिमी विक्रमी पाऊस झाल्याने सर्व नदी नाल्यांना महापूर आले आहे. वाघाड धरण ओवरफ्लो झाले असून पुणेगाव धरणातून 2800 क्युसेस उनंदा नदीत विसर्ग सुरु आहे. पालखेड धरणातून 44000 क्युसेस चा विसर्ग कादवा नदीत करण्यात आला आहे. त्यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे. नाशिक कळवण रस्त्यावर रणतले येथे तसेच शहरात स्टेट बँक परिसर व कोलवन नदीच्या पुलावरून काही काळ पाणी जात वाहतूक विस्कळीत झाली होती. अनेक रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने विविध गावांचा संपर्क तुटला आहे तर इंदोरे येथे भिंत कोसळून कलावती गांगोडे हि महिला ठार झाली तर ओझे येथे शाळेची संरक्षक भिंत कोसळून योगेश उघडे हा विद्यार्थी जखमी झाला आहे .शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने सर्व नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

 

 

 

 

Web Title: Due to heavy rainfall, flooding in Dindori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.