आवक घटल्याने मेथी ५० रु पये जुडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:48 AM2019-05-20T00:48:07+5:302019-05-20T00:48:24+5:30
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी (दि़ १९) मेथीची केवळ तीन ते चार हजार जुड्यांची आवक झाल्याने बाजारभाव तेजीत आले होते. सायंकाळी झालेल्या लिलावात मेथी पन्नास रु पये प्रति जुडी दराने विक्री झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.
पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी (दि़ १९) मेथीची केवळ तीन ते चार हजार जुड्यांची आवक झाल्याने बाजारभाव तेजीत आले होते. सायंकाळी झालेल्या लिलावात मेथी पन्नास रु पये प्रति जुडी दराने विक्री झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. शेकडा पाच हजार रुपये असा बाजारभाव मेथी भाजीला मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे, तर पालेभाज्यांचे दर वाढल्याने सर्वसामान्य ग्राहकांना दोन वेळच्या पालेभाज्या खरेदीसाठी खिशाचा विचार करून आर्थिक झळ सहन करावी लागत आहे.
गेल्या आठवड्यात साठ रु पये प्रति जुडी दराने विक्र ी झालेल्या कोथिंबीर जुडीला लिलावात ३५ रुपये असा बाजारभाव मिळाला परजिल्ह्यातील बाजारपेठेत स्थानिक शेतमाल सुरू झाल्याने कोथिंबीर मालाचे बाजारभाव काही प्रमाणात घसरले आहेत.