भाजीपाल्याची आवक घटल्याने बाजारभाव कडाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 07:19 PM2019-04-01T19:19:28+5:302019-04-01T19:19:54+5:30
पाटोदा : उन्हाची तीव्रता वाढल्याने भाजीपाला उत्पादनात मोठी घट आली आहे. त्यामुळे बाजारभाव वाढले आहे. भाववाढीमुळे खिशाला चाट बसत आहे. येवला तालुक्यातील पाटोदा येथे दर सोमवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात भाजीपाल्याच्या आवकेत मोठया प्रमाणात घट झाली असून भावात तेजी आली आहे
पाटोदा : उन्हाची तीव्रता वाढल्याने भाजीपाला उत्पादनात मोठी घट आली आहे. त्यामुळे बाजारभाव वाढले आहे. भाववाढीमुळे खिशाला चाट बसत आहे. येवला तालुक्यातील पाटोदा येथे दर सोमवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात भाजीपाल्याच्या आवकेत मोठया प्रमाणात घट झाली असून भावात तेजी आली आहे. या आठवडे बाजारात गवार एकशे वीस ते एकशे चाळीस रु पये किलो प्रमाणे विक्र ी होत होती. तर बटाटे दहा रु पये किलो असा कमी भावात मिळत असल्याने सर्वसामान्य नागरीक त्याकडे वळलेला दिसत आहे. तसेच उन्हाळ्यात जीवाला गारवा देणाऱ्या फळभाज्या व फळांचे देखील दर वाढले आहेत. टरबूज, खरबूज, काकडी, लिंबू यांना मोठी मागणी आहे. भाजीपाल्याचे भाव वाढल्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
येथील आठवडे बाजारात शेपू, पालक कोथंबीर, कांदापात यांची पंधरा रु पये जुडीने विक्र ी झाली, तर मेथी आवक कमी असल्याने वीस ते पंचवीस रु पये जुडीचे भाव होते. वांग्याची आवक जास्त झाल्याने सरासरी पंधरा ते वीस रु पये किलोस भाव मिळाला. टमाटे चाळीस रु पये किलो, काकडी, बीट, द्राक्षे, सिमला मिरची भेंडी साठ रु पये, कारले ऐंशी रु पये, हिरवी मिरची शंभर रु पये किलो, करडई, पंधरा रु पये जुडी, गिलके, दोडके, ऐंशी रु पये, भोपळा पंधरा रु पये असे सर्वसाधारण भाव होते.
यंदा पाऊस कमी पडल्यामुळे या भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. आहे त्या पाण्यावर शेतकरी भाजीपाला पिके घेत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली असल्याने या भाजीपाला पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे शेतात केलेला खर्चही फिटत नाही.
- आशाबाई कुंभारकर, भाजीपाला उत्पादक शेतकरी.
बाजारात सर्वच भाजीपाल्याची आवक कमी झाल्यामुळे बाजारभाव तेजीत होते .त्यामुळे कोणती भाजी घ्यावी हा प्रश्न होता. तेजीमुळे बाजाराचे गणति कोलमडले. तरीही भाजीपाला खरेदी करणे आवशक होते.
- मंगेश देवढे, ग्राहक.