आवक वाढल्याने ५० टक्के बाजारभाव घसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 01:44 AM2018-06-04T01:44:03+5:302018-06-04T01:44:03+5:30
पंचवटी : गेल्या शुक्र वारी (दि.१) शेतकरी संघटनेने विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाचा सुरुवातीला दोन दिवस शेतमालावर परिणाम जाणवला. शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे बाजार समितीत शेतमालाची आवक घटल्याने बाजारभाव तेजीत आले होते. मात्र रविवारी (दि.३) नाशिक बाजार समितीत शेतमालाची आवक वाढल्याने बाजारभाव ५० ते ५५ टक्क्यांनी घसरले.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलावासाठी आलेला कृषिमाल.
पंचवटी : गेल्या शुक्र वारी (दि.१) शेतकरी संघटनेने विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाचा सुरुवातीला दोन दिवस शेतमालावर परिणाम जाणवला. शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे बाजार समितीत शेतमालाची आवक घटल्याने बाजारभाव तेजीत आले होते. मात्र रविवारी (दि.३) नाशिक बाजार समितीत शेतमालाची आवक वाढल्याने बाजारभाव ५० ते ५५ टक्क्यांनी घसरले.
सुरुवातीला दोन दिवस मेथी, कांदापात तसेच कोथिंबीर जुडीला कमीत कमी ५० रुपये असा बाजारभाव मिळत होता. मात्र शेतकरी संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदमुळे पालेभाज्या मालाची आवक कमी होऊन शेतकऱ्यांनी आणलेल्या शेतमालाला चांगला बाजारभाव मिळत असल्याने शनिवारपासून बाजार समितीत पालेभाज्या मालाची आवक वाढली आहे. रविवारी तर मोठ्या प्रमाणात शेतमाल दाखल झाल्याने मेथी, कोथिंबीर, शेपू तसेच कांदापातचे बाजारभाव घसरले.
रविवारी मोठ्या प्रमाणात शेतमाल दाखल झाल्याने कोथिंबीर १५, कांदापात ३०, शेपू १५ तर मेथी १७ रुपये प्रति जुडी दराने विक्र ी झाल्याचे व्यापारी वर्गाने सांगितले. संप काळात शेतकरीवर्गात बाजार समितीतील व्यवहार सुरळीत आहेत की नाही याबाबत संभ्रमाचे वातावरण पसरले होते त्यामुळे सुरुवातीला संपापूर्वी दोन ते
तीन दिवस कमी प्रमाणात शेतमाल विक्रीसाठी आल्याने बाजारभाव वधारले होते.