मागणी वाढल्याने टोमॅटोच्या भावात झाली वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 05:43 PM2019-01-08T17:43:45+5:302019-01-08T17:47:57+5:30
टोमॅटोच्या आवकेत झालेली घट आणि परदेशातून भारतीय टोमॅटोला वाढलेल्या मागणीमुळे यंदाच्या हंगामात सिन्नर तालुक्यात टोमॅटोच्या दराने पहिल्यांदाच तेजी गाठली आहे.
Next
२० किलोच्या क्रेटला ४०० ते ५०० रूपयांपर्यंतचे दर कृषी ऊत्पन्न बाजार समितीच्या पांढुर्ली उपबाजारात मिळाला आहे. निर्यातक्षम दर्जेदार टोमॅटोला पांढुर्ली उत्पन्न बाजारात सुमारे ५११ रूपये क्रेट तर सरासरी ३०० रूपये दर मिळू लागला आहे. २१ डिसेंबरपूर्वी टोमॅटोचे दर कोसळले होते. त्यानंतर आता भावात तेजी आली आहे. त्यामुळे तालुक्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यात समाधानाचे वातावरण आहे.