मेथीची आवक वाढल्याने भाव घसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 01:08 AM2019-07-21T01:08:30+5:302019-07-21T01:09:47+5:30
गेल्या काही दिवसांपासून चाळीस ते पन्नास रुपये प्रतिजुडी दराने विक्री होणाऱ्या मेथी भाजीची मागील दोन दिवसांपासून आवक वाढल्याने बाजारभावात घसरण झाली आहे. शनिवारी (दि.२०) नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आलेल्या मेथी जुडीला पंधराशे रुपये शेकडा असा बाजारभाव मिळाल्याने मेथी पंधरा रुपयांपर्यंत खाली आली आहे.
पंचवटी : गेल्या काही दिवसांपासून चाळीस ते पन्नास रुपये प्रतिजुडी दराने विक्री होणाऱ्या मेथी भाजीची मागील दोन दिवसांपासून आवक वाढल्याने बाजारभावात घसरण झाली आहे. शनिवारी (दि.२०) नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आलेल्या मेथी जुडीला पंधराशे रुपये शेकडा असा बाजारभाव मिळाल्याने मेथी पंधरा रुपयांपर्यंत खाली आली आहे.
गेल्या आठवड्यात मेथी प्रतिजुडीला चाळीस ते पन्नास रुपये असा बाजारभाव मिळत होता. बाजार समितीत लातूर तसेच खेड मंचर या भागातूनदेखील मेथी भाजीची आवक होत असल्याने शेतमालाची आवक वाढली आहे. नाशिक बाजार समितीत कोथिंबीर तसेच मेथी भाजीला चांगला बाजारभाव मिळत असल्याने परजिल्ह्यातून शेतमाल विक्रीसाठी दाखल होत आहे. नाशिक बाजार समितीत मेथी भाजीच्या प्रतिजुडीला कमीत कमी पंधरा रुपये असा बाजारभाव शनिवारी सायंकाळी झालेल्या लिलावात मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.
दरम्यान कोथिंबीर मालाचीदेखील आवक वाढल्याने बाजार काही प्रमाणात घसरले आहेत. शनिवारी सायंकाळी कोथिंबीर कमीत कमी (पन्नास रुपये प्रतिजुडी) पाच हजार रुपये शेकडा दराने विक्री झाली होती.