शुल्क वाढीमुळे ग्रामस्थ संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 01:09 AM2017-09-01T01:09:17+5:302017-09-01T01:09:48+5:30
विल्होळी येथील नाशिक पब्लिक स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळा प्रशासनाने अचानक शुल्कवाढ केल्याने पालकांनी संताप व्यक्त केला. त्रस्त पालकांनी व ग्रामस्थांनी विल्होळीचे सरपंच बाजीराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाची भेट घेत सदरची शुल्कवाढ रद्द करावी, अशी मागणी केली आहे.
सिडको : विल्होळी येथील नाशिक पब्लिक स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळा प्रशासनाने अचानक शुल्कवाढ केल्याने पालकांनी संताप व्यक्त केला. त्रस्त पालकांनी व ग्रामस्थांनी विल्होळीचे सरपंच बाजीराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाची भेट घेत सदरची शुल्कवाढ रद्द करावी, अशी मागणी केली आहे.
विल्होळी येथे गेल्या दोन वर्षांपासून नाशिक पब्लिक स्कूल ही इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू आहे. या शाळेत विल्होळी, सारूळ, राजूर-बहुला यांसह परिसरातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेने नवीन वर्ष सुरू होऊन काही महिने उलटत नाही तोच अचानक शुल्कवाढ केल्याने ग्रामस्थ व पालकवर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. यावेळी सरपंच बाजीराव गायकवाड, दामोदर थोरात, सोमनाथ भावनाथ, सुभाष चव्हाण, रामदास मते, परशराम सहाणे आदी उपस्थित होते. यावेळी संचालक गुळवे यांनी सांगितले की, शुल्कवाढ कमी करण्यासंदर्भात सकारात्मक विचार केला जाईल.