उन्हाचा पारा वाढल्याने थंड पेयांच्या दुकानात गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 04:22 PM2019-03-28T16:22:55+5:302019-03-28T16:25:41+5:30
पाटोदा : पाटोदा परिसरात गेल्या एक महिन्यापासून उन्हाचा पारा रोजच वाढत आहे. गुरुवारी (दि.२८) दुपारी दोन वाजेच्या सुमारास येथील तापमान सुमारे ३९ अंशापर्यंत गेल्याने गावं परिसरात अघोषित संचारबंदीसारखी स्थिती निर्माण झाली होती.
पाटोदा : पाटोदा परिसरात गेल्या एक महिन्यापासून उन्हाचा पारा रोजच वाढत आहे. गुरुवारी (दि.२८) दुपारी दोन वाजेच्या सुमारास येथील तापमान सुमारे ३९ अंशापर्यंत गेल्याने गावं परिसरात अघोषित संचारबंदीसारखी स्थिती निर्माण झाली होती.
उन्हाचा पारा वाढल्याने नागरिकांनी रसवंतीगृह शीतपेयांच्या दुकानात गर्दी करून जीवाला गारवा मिळवण्याचा प्रयत्न करतांना दिसत होते. येत्या दोन दिवसात तापमान ४१ अंशावर जाणार असल्याने उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक काळजी घेताना दिसत आहेत.
रखरखत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी बाजारात विविध प्रकारच्या टोप्या विक्र ीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. नागरिकांचा गॉगल, टोप्या खरेदीकडे नागरिकांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे. शरीराला गारवा निर्माण करणाऱ्या द्राक्ष, टरबूज, काकडी यासारख्या फळांना मागणी वाढली आहे. विविध प्रकारचे ज्यूस, ताक, लस्सी आदी थंड पेयांनी देखील मागणी वाढल्याचे दिसून येत आहे. त्याच बरोबर उसाचा रस घेण्याकरीता रसवंतीगृहे हाउसफुल होत आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच सूर्य आग ओकू लागला आहे. गेल्या दहा बारा दिवसांपासून येथील तापमान ३५/३६ अंश इतके नोंदवले जात होते. मात्र गुरुवारी पारा ३९ अंशावर गेल्याने प्रचंड उकाडा जाणवत होता. ऐन दुपारच्या वेळेसच वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा खंडीत केल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागला.