उष्णता वाढल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 01:20 PM2018-10-09T13:20:05+5:302018-10-09T13:21:39+5:30
मालेगाव : : खडकी : मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने उष्णता वाढल्याने रोग फैलाव करणारे डास, किटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे. हिवताप आजार पसरले आहे. किटकनाशक औषधांची लवकर फवारणी करावी लागणार आहे
मालेगाव : : खडकी : मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने उष्णता वाढल्याने रोग फैलाव करणारे डास, किटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे. हिवताप आजार पसरले आहे. किटकनाशक औषधांची लवकर फवारणी करावी लागणार आहे. लहान बालके व वृद्ध दगावण्याची शक्यता निर्माण झाल्याने ग्रामीण भागातील आरोग्य धोक्यात आले आहे.
परतीच्या पावसाची प्रतीक्षा संपली आहे. मोठा पाऊस झाला तरच डासाचे व रोगी किटकांचे प्रमाण कमी होते असे जाणकारांचे मत आहे. गावातील प्रत्येक घरातून एक रुग्ण हिवतापाने दगावला आहे. कोरडे व सुक्ष्म व उष्ण वातावरणाने आरोग्याला अपाय होत होत आहे. रुग्णांनी भरलेले दवाखाने हिवताप व सर्दी-खोकल्याचे नुमने प्राप्त होत आहे. संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाणी व रक्त तपासणी करणे गरजेचे आहे तरच रोगावर लवकर नियंत्रण करण्यास मदत होईल.
पिण्याचे पाणी दूषित व जड स्वरुपाचे असल्याने त्यातून आजारांचा फैलाव होता. शुद्ध पाणी पिण्यास मिळत नाही. विहीर व कुपनलिकेतील पाणी प्यावे लागत आहे. पूर्वी हिवतापाचे डॉक्टर गावोगावी औषध, गोळ्या देत सध्या मात्र ते दिसून येत नाही. त्यांच्या फिरण्याने साथीच्या रोगांची माहिती मिळत असत व त्यावर कीटकनाशक औषधांची फवारणी केली जात होती. मात्र फवारणी करणारे गायबच झाल्याने आरोग्याची काळजी नागरिकांना स्वत:च घ्यावी लागत आहे.
शासकीय रुग्णालयांची अवस्थाही दयनीय झालेली आहेत. तेथेच डासाचे प्रमाण वाढलेले आहे. यामुळे रुग्ण रुग्णालयात जाण्यासाठी धजावत नाही. नैसर्गिक वातावरणातील बदल यामुळे रोगांची माहिती होत नाही. ग्रामस्थांची प्रतिकारशक्ती बरी असल्याने ते आजाराला लोटतात. मात्र तापाने लाल व पांढºया पेशी कमी जास्त झाल्याने रुग्ण दगावतात. प्रथमोपचाराच्या बाहेर स्थिती गेल्याने रुग्णांना दवाखान्यातच मुक्काम करावा लागतो. यामुळे आर्थिक स्थिती नसल्याने उसनवारीनेच सध्या ग्रामीण भाग आपले व्यवहार चालवताना दिसत आहे. थंडीचे वातावरण नागरिकांना तारणार आहे.