आवक वाढल्याने डाळिंबाचे दर घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 12:39 AM2018-11-26T00:39:12+5:302018-11-26T00:39:36+5:30

पेठरोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शरदचंद्र पवार फळबाजारात नाशिकसह अन्य परजिल्ह्यातून येणाऱ्या डाळिंब मालाची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्यातच थंडीमुळे डाळिंबाची मागणी घटल्याने बाजारभाव कोसळले आहेत. बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या डाळिंबाला २० रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळत आहे.

Due to increase in income, the pomegranate prices dropped | आवक वाढल्याने डाळिंबाचे दर घसरले

आवक वाढल्याने डाळिंबाचे दर घसरले

googlenewsNext

पंचवटी : पेठरोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शरदचंद्र पवार फळबाजारात नाशिकसह अन्य परजिल्ह्यातून येणाऱ्या डाळिंब मालाची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्यातच थंडीमुळे डाळिंबाची मागणी घटल्याने बाजारभाव कोसळले आहेत. बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या डाळिंबाला २० रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळत आहे.
नाशिक फळबाजारातून कोलकाता, दिल्ली, बिहार तसेच उत्तर प्रदेश राज्यात मोठ्या प्रमाणात डाळिंबाची निर्यात केली जाते. तसेच गेल्या काही दिवसांपासून सफरचंदाची आवक वाढलेली आहे. किरकोळ बाजारात सफरचंद ३० ते ४० रु पये किलो दराने मिळत असल्याने ग्राहक डाळिंब, सफरचंदला पसंती देत आहेत. जम्मू-काश्मीर येथून सफरचंदाची आवक होते. दिल्लीत सफरचंद दाखल झाल्यानंतर सदर माल संपूर्ण भारतभर रवाना केला जातो.  विशेष म्हणजे यंदा सफरचंदाची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. सध्या हिवाळा सुरू झाल्याने थंडीची लाट पसरत आहे. थंडीमुळे डाळिंब फळाला तडे जातात.
काही भागात पाण्याची टंचाई जाणवत असल्याने डाळिंबाला सुकत आहे. नुकसान नको म्हणून शेतकरीबांधव डाळिंबाचा खुडा करून विक्र ीसाठी बाजार समितीत आणत आहे. फळबाजारात  संगमनेर, अहमदनगर तसेच औरंगाबाद जिल्ह्यातून डाळिंबाला विक्रीसाठी नाशिक बाजार समितीत येत असतो.
शिवार सौदे बंद
काही दिवसांपासून डाळिंबाला बाजारभाव नसल्याने मंदी पसरलेली आहे. पूर्वी शेतात जाऊन व्यापारी डाळिंब मालाचे शिवार सौदे करायचे. मात्र मंदीमुळे गेल्या काही दिवसांपासून शिवार सौदे बंद असल्याचे डाळिंब आडत्यांनी सांगितले.

Web Title: Due to increase in income, the pomegranate prices dropped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.