माश्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 05:45 PM2019-07-10T17:45:34+5:302019-07-10T17:46:42+5:30
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील अस्वली स्टेशन येथे सुरू असलेल्या एका पोल्ट्रीमुळे माश्यांचा प्रचंड प्रमाणात उपद्रव वाढल्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. माश्यांमुळे नागरिकांना घरात बसणे देखील कठीण झाले आहे. नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी तहसीलदार तसेच संबंधित अधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष देवून तसेच पाहणी करून सदर पोल्ट्री फार्म बंद करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे रहिवाशांनी केली आहे.

नांदूरवैद्य हद्दीत असलेल्या या पोल्ट्री फार्ममुळे परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली असून माश्यांचा उपद्रव वाढला आहे. सदर पोल्ट्रीमुळे या भागातील रहिवाशी पुरते वैतागला आहेत. दिवस - रात्र दरवाजे, खिडक्या बंद ठेवाव्या लागत आहे.
याबाबत नांदूरवैद्य ग्रामपंचायतीकडे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सर्व शासनस्तरावर निवेदने देऊन शिवाय या संदर्भात वारंवार कळवून सुध्दा कोणतीही दखल घेत नसल्याची नागरीकांची ओरड आहे.
आगामी दहा दिवसात पोल्ट्री फार्मबाबत संबंधित अधिकारी यांनी योग्य निर्णय न घेतल्यास रस्त्यावर उतरणे भाग पडेल असे निवेदन देणाºया नामदेव बोराडे, संजय बोराडे, राजू बोराडे, विजय बोराडे, पोपट बोराडे, सुनिल बोराडे, गंगुबाई बोराडे, व किरण बोराडे आदींनी कळविले आहे.
प्रतिक्रि या
माश्यांच्या वाढत्या उपद्रवाचा गेली दोन ते तीन वर्षांपासून त्रास सहन करत असून याबाबत आम्ही सदर पोल्ट्री फार्म मालक व बेलगाव कुºहे येथील आरोग्य अधिकारी यांच्या निदर्शनास ही बाब आणून देऊन देखील आजपर्यंत कुठलाही निर्णय झालेला नाही. आता आम्ही कारवाईची अपेक्षा करीत आहेत.
- राजू बोराडे.
रहिवाशी. अस्वली स्टेशन.