वाढत्या लोकसंख्येमुळे पाणीसाठा संपुष्टात होलानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 01:07 AM2018-01-30T01:07:34+5:302018-01-30T01:07:59+5:30

आशिया-आफ्रिका खंडामधील देशांपुढे भविष्यात पाण्याची मोठी समस्या निर्माण होणार आहे. कारण वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत मानवी उपयोगासाठी लागणारी पाण्याची उपलब्धता अत्यंत कमी झाली आहे. लोकसंख्येच्या वाढत्या भस्मासुरामुळे पाणीसाठा संपुष्टात येऊ लागला आहे, असे प्रतिपादन राज्य जीवन प्राधिकरणाचे माजी सचिव सदस्य व पाणी विषयाचे अभ्यासक राजेंद्र होलानी यांनी केले.

Due to increasing population, due to water level losses | वाढत्या लोकसंख्येमुळे पाणीसाठा संपुष्टात होलानी

वाढत्या लोकसंख्येमुळे पाणीसाठा संपुष्टात होलानी

Next

नाशिक : आशिया-आफ्रिका खंडामधील देशांपुढे भविष्यात पाण्याची मोठी समस्या निर्माण होणार आहे. कारण वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत मानवी उपयोगासाठी लागणारी पाण्याची उपलब्धता अत्यंत कमी झाली आहे. लोकसंख्येच्या वाढत्या भस्मासुरामुळे पाणीसाठा संपुष्टात येऊ लागला आहे, असे प्रतिपादन राज्य जीवन प्राधिकरणाचे माजी सचिव सदस्य व पाणी विषयाचे अभ्यासक राजेंद्र होलानी यांनी केले.  मविप्रच्या वतीने तीन दिवसीय डॉ. वसंतराव पवार व्याख्यानमालेचे आयोजन रावसाहेब थोरात सभागृहात करण्यात आले. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प होलानी यांनी ‘पाणी एक लढा’ या विषयावर गुंफले. पृथ्वीवरील एकूण पाणीसाठ्यापैकी मानवी  जीवनसृष्टीसाठी वापराण्याजोगे असलेला पाणीसाठा आणि लोकसंख्या याबाबत विविध आलेखांच्या माध्यमातून होलानी यांनी उपस्थितांसमोर निरीक्षणे नोंदविली.  व्याख्यानमालेच्या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, नाना महाले, डॉ. तुषार शेवाळे, माणिकराव बोरस्ते, डॉ. सुनील ढिकले, भाऊसाहेब खताळे आदी मान्यवर उपस्थित होते.  पाण्याचे योग्य व्यवस्थापन आजपासून करणे ही काळाची गरज आहे, एकूणच वाढत्या लोकसंख्या आणि पाण्याच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे पाणीसाठा अपुरा पडू लागला असल्याचा निष्कर्ष त्यांनी यावेळी सांगितला. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी केले. कमीत-कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त पिके कशी घेता येतील त्याचप्रमाणे पाण्याचा कमी वापर केल्यास शेतीचीही उत्पादन सुधारण्यास मदत होईल, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी १९६२ साली भारतामध्ये तीन हजार क्युबिक लिटर प्रतिव्यक्ती पाणी उपलब्ध होत होते; मात्र ते २०१४ साली केवळ एक हजार १४५ क्युबिक लिटर प्रतिव्यक्ती इतके कमी झाले.

Web Title: Due to increasing population, due to water level losses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक