उन्हाच्या वाढत्या झळांनी नाशिककर झाले त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 01:00 AM2018-03-28T01:00:47+5:302018-03-28T01:00:47+5:30

मार्चअखेर शहरासह जिल्ह्यात ऊन्हाच्या झळा अधिक तीव्रतेने जाणवत असल्याने नाशिककर हैराण झाले आहे. कमाल तपमानाचा पारा पस्तीशीच्या पुढे सरकला असून मंगळवारी (दि.२७) मालेगावमध्ये कमाल तपमान ४०.२ अंश तर नाशिकमध्ये ३८.५ इतक्या कमाल तपमानाची नोंद हवामान निरिक्षण केंद्राने केली.

 Due to the increasingly hot weather in Nashik, | उन्हाच्या वाढत्या झळांनी नाशिककर झाले त्रस्त

उन्हाच्या वाढत्या झळांनी नाशिककर झाले त्रस्त

Next

नाशिक : मार्चअखेर शहरासह जिल्ह्यात ऊन्हाच्या झळा अधिक तीव्रतेने जाणवत असल्याने नाशिककर हैराण झाले आहे. कमाल तपमानाचा पारा पस्तीशीच्या पुढे सरकला असून मंगळवारी (दि.२७) मालेगावमध्ये कमाल तपमान ४०.२ अंश तर नाशिकमध्ये ३८.५ इतक्या कमाल तपमानाची नोंद हवामान निरिक्षण केंद्राने केली. चालू महिन्याचा पंधरवडा उलटत नाही तोच उन्हाच्या झळा अधिक तीव्र होण्यास सुरूवात झाली. नाशिक शहराचे तपमान तीस अंशांपुढे सरकण्यास सुरुवात झाली. कमाल तपमानात सातत्याने वाढ होऊ लागल्याने नाशिककरांना उन्हाच्या झळा असह्य होऊ लागल्या आहेत. वीस मार्चपासून कमाल तपमानाचा पारा पस्तीशीपर्यंत सरकला आणि आता मार्चअखेर तपमान जिल्ह्यात चाळीशीपर्यंत पोहचले आहे तर शहरात चाळीशीच्या जवळपास आले आहे. एकूणच नाशिक उन्हामुळे तापले आहे. कमाल तपमानाबरोबर किमान तपमानही वाढत असल्याने वातावरणात कमालीचा उष्मा जाणवू लागला आहे. हवेतील गारवा जवळपास संपुष्टात आला असून दुपारनंतर वारादेखील उष्ण स्वरुपाचा वाहू लागल्याचे जाणवत आहे. त्यामुळे नागरिक शक्यतो १२ वाजेनंतर घराबाहेर पडणे टाळत आहे. घराबाहेर पडताना नाशिककर योग्य ती खबरदारी घेताना दिसून येत आहे.
तपमानाचा पारा एप्रिलच पहिला आठवड्यासंपल्यानंतर काहीसा खाली उतरण्यास सुरूवात होईल. मागील वर्षी २७ मार्च रोजी शहराचे तपमान ४०.३ इतके नोंदविले गेले होते.

Web Title:  Due to the increasingly hot weather in Nashik,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.