डिजे वाजविल्याने दोघांची थेट कारागृहात रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 01:10 PM2017-11-30T13:10:39+5:302017-11-30T13:11:01+5:30
सटाणा : येथील वाणी मंगल कार्यालयात झालेल्या हळदीच्या कार्यक्र मात उशिरापर्यंत डीजे वाजविल्यामुळे सटाणा न्यायालयाने दोघांची रवानगी थेट नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात करण्याचे आदेश दिले आहे.
सटाणा : येथील वाणी मंगल कार्यालयात झालेल्या हळदीच्या कार्यक्र मात उशिरापर्यंत डीजे वाजविल्यामुळे सटाणा न्यायालयाने दोघांची रवानगी थेट नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात करण्याचे आदेश दिले आहे.
शहरातील वाणी मंगल कार्यालयात गेल्या २७ नोव्हेंबर रोजी एका विवाहाच्या हळदीच्या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. उशिरापर्यंत स्पीकर लावला म्हणून सटाणा पोलिसांनी संबंधितांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार खटला दाखल केला होता. या खटल्यात मुंबई पोलीस कायदा अधिनियम कलम ३८/१३६ नुसार संबंधितांना पाच हजार दंड आकारला जातो.मात्र सटाणा न्यायालयाने या खटल्याबाबत गांभीर्याने घेत सुभाष भास्कर शिरसाठ व अनिल ततार यांनी न्यायालयाचा अवमान केला म्हणून दोघांची रवानगी थेट नाशिक मध्यवर्ती कारागृहात केली आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यात पहिल्यांदाच दोषींची न्यायालयाने थेट मध्यवर्ती कारागृहात रवानगी केल्याने खळबळ उडाली आहे.