अपु-या पावसामुळे बागलाणमध्ये भीषण जलसंकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:42 PM2018-11-15T12:42:29+5:302018-11-15T12:46:35+5:30
नितीन बोरसे /सटाणा : बागलाण तालुक्यात यंदा अपु-या पावसामुळे आॅक्टोबर महिन्यापासूनच पाणी टंचाईने डोके वर काढले आहे.नद्यांना पाणी नसल्यामुळे नदीकाठच्या पाणीपुरवठा विहिरींनी देखील तळ गाठल्याने योजना कोलमडल्या आहेत.त्यामुळे ग्रामीण भागासह शहरात पाणी कपात होऊन पाणीबाणी निर्माण झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
नितीन बोरसे /सटाणा : बागलाण तालुक्यात यंदा अपुºया पावसामुळे आॅक्टोबर महिन्यापासूनच पाणी टंचाईने डोके वर काढले आहे.नद्यांना पाणी नसल्यामुळे नदीकाठच्या पाणीपुरवठा विहिरींनी देखील तळ गाठल्याने योजना कोलमडल्या आहेत.त्यामुळे ग्रामीण भागासह शहरात पाणी कपात होऊन पाणीबाणी निर्माण झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे.बागलाणला टंचाईचे आठ महिने काढायचे आहेत.असे भीषण जलसंकट उभे ठाकले असतांना दुसरीकडे दररोज टॅँकरच्या संख्येत होणारी वाढ ,नदी काठच्या गावांची पाण्याच्या आवर्तनासाठी होत असलेली मागणी या भयावह परिस्थितीमुळे प्रशासनाची चांगलीच कसरत होतांना दिसत आहे. बागलाण तालुक्यात यंदा पावसाने पाठ फिरविल्यामुळे आॅक्टोबरपासूनच दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत.पावसाळ्यातच विहिरींनी तळ गाठल्यामुळे पाण्यासाठी वनवन भटकंती करण्याची वेळ बागलाण वासीयांवर येऊन ठेपली आहे.परतीच्या पावसासाठी देखील होमहवन ,यज्ञ करण्यात आले.मात्र वरु ण राजा पावला नाही.तरी देखील बेमोसमी पाऊस तरी बरसेल परंतु तो देखील बरसला नाही.यामुळे भीषण जलसंकट उभे असून १९७२ पेक्षाही यंदा भीषण दुष्काळ असल्याचा अनुभव शेतकरी सांगत आहेत.विहिरीला जेमतेम पाणी आहे .म्हणून रब्बी कांद्याचे बियाणे टाकले रोपही उतले.रोप लावले आण िविहिरीचे पाणी आटल्याने शेकडो एकर कांद्याचे पिक सोडून देण्याची वेळ बागलाण मधील बहुतांश शेतकºयांवर आली आहे.यामुळे थोडीफार पुंजी जपून ठेवली तीही गेल्याने शेतकरी दुष्काळाच्या झळांनी होरपळून निघाला आहे.बहुतांश शेतकºयांनी मक्याचा पेरा केला .एक पाऊस आला.नंतर मात्र पाऊस गायब झाल्याने पुलोर्यातच पिक करपले.बाजरी ,सोयाबीनचीही हीच अवस्था,जनावरांना आणि माणसांना आज हंडाभर पाणी विहिरीत साचतेय परंतु पुढचे आठ महिने कसे जाणार,माणूस कुठूनही पाण्याची तहान भागवेल जनावरांचे काय या विवंचनेत शेतकरी रोज मरतांना दिसत असल्याचे भीषण दुष्काळाचे वास्तव बागलाण मध्ये अनुभवायला मिळत आहेत.यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.