मागणीअभावी रोपे उकिरड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 09:13 PM2020-05-15T21:13:49+5:302020-05-15T23:30:49+5:30

येवला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून शासनाने सर्वत्र लॉकडाउन व संचारबंदी लागू केली आहे. परिणामी बंद असलेल्या बाजारपेठा व विपणन व्यवस्था यामुळे टोमॅटो, मिरची लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल कमी झाला आहे.

 Due to lack of demand, seedlings are burnt | मागणीअभावी रोपे उकिरड्यावर

मागणीअभावी रोपे उकिरड्यावर

Next

येवला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून शासनाने सर्वत्र लॉकडाउन व संचारबंदी लागू केली आहे. परिणामी बंद असलेल्या बाजारपेठा व विपणन व्यवस्था यामुळे टोमॅटो, मिरची लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल कमी झाला आहे. कोरोनाच्या संकटाने शेतकरीवर्गाकडून टोमॅटो, मिरची रोपांची मागणी रोडावली त्यामुळे पदरमोड करीत रोपे तयार करावे की नाही असा संभ्रम रोपवाटिका चालकांना पडला आहे.
कोरोनाच्या फटक्याने रोपवाटिका चालक अडचणीत सापडले आहेत. हंगामाच्या भरवशावर तयार करून ठेवलेल्या रोपांचा पहिला हप्ता मागणीअभावी उकिरड्यावर फेकून देण्याची वेळ रोपवाटिका चालकांवर आली आहे.
साधारणपणे अक्षय्यतृतीयेनंतर नाशिक जिल्ह्याच्या पिंपळगाव बसवंत व आसपासच्या परिसरात तसेच, येवला तालुक्याला लागून असलेल्या रवंदा भागात नांदूर-मधमेश्वर कालव्याच्या पाण्यावरती व निफाड-लासलगाव भागात टोमॅटो व मिरची लागवडीला सुरु वात होते, परंतु यंदा कोरोनामुळे शेतकरीच संभ्रमात आहे. त्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांकडून रोपवाटिका चालकांकडे रोपे तयार करण्याची मागणी करण्यात आलेली नाही. हंगामात चांगली मागणी राहील या आशेवर बºयाच रोपवाटिका चालकांनी मिरची व टोमॅटोची रोपे आगाऊ तयार करून ठेवली होती, परंतु कोरोनाच्या फटक्याने रोपवाटिका चालक अडचणीत सापडले आहेत. रोपवाटिका चालकांना हंगामाच्या भरवशावर तयार करून ठेवलेल्या रोपांचा पहिला हप्ता मागणीअभावी उकिरड्यावर फेकून देण्याची वेळ आली.
सर्वसाधारणपणे १५ ते २० मे पर्यंत ७० टक्के शेतकºयांच्या रोपे तयार करण्याच्या आॅर्डर आलेल्या असतात व अ‍ॅडव्हान्स म्हणून ५० टक्के पैसेही जमा झालेले असतात, परंतु यंदा अजूनपर्यंत पाच-दहा टक्केही शेतकºयांनी रोपांची आॅर्डर दिलेली नाही. काही रोपवाटिका चालकांनी सगळं सुरळीत होईल असा विचार करून नर्सरी बांधकाम करून ठेवले आहे. तर काही आता दिवस जवळ आले आहेत, मिळतील तेवढ्या आॅर्डर्ससाठी का होईना नर्सरीच्या कामाला लागावे असा विचार करून नर्सरी तयार करीत आहेत, परंतु यंदा ३०-४० टक्केही आॅर्डर मिळते की नाही या संभ्रमात नर्सरी चालक आहेत.
-------------------------------
कृषी विभागही पडला पेचात
शेतकºयांनाही अजून टोमॅटो आणि मिरची लागवड करायची की नाही हा निर्णय घेता येत नाही. आतापर्यंत एक ते दोन टक्के टोमॅटो, मिरची लागवड झालेली आहे, जी दरवर्षी ३० ते ४० टक्के झालेली असायची. कृषी विभागालाही शेतकºयांना याबद्दल काय मार्गदर्शन करावे आणि कसे टोमॅटो, मिरची लागवडीसाठी प्रवृत्त करावे असा पेच पडला आहे. लॉकडाउन उठल्यानंतर टोमॅटो आणि मिरचीचा मोठा तुटवडा भासेल असे चित्र सध्या तरी दिसत आहे.

Web Title:  Due to lack of demand, seedlings are burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक