व्यासंगी व्यक्तींच्या उणीवेमुळे उच्चशिक्षणाची परिसंस्था धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 12:36 AM2018-03-01T00:36:58+5:302018-03-01T00:36:58+5:30
निसर्गातील घटक नष्ट होत चालल्यामुळे जशी निसर्गाची परिसंस्था धोक्यात येते, नेमके तसेच उच्चशिक्षणातील व्यासंगी, कर्तव्यनिष्ठ आणि संस्थेशी बांधिलकी मानून सेवारत असलेली माणसे वयोमानपरत्वे निवृत्त होतात, तेव्हा उच्चशिक्षणाची परिसंस्थासुद्धा धोक्यात येते असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी केले.
देवळा : निसर्गातील घटक नष्ट होत चालल्यामुळे जशी निसर्गाची परिसंस्था धोक्यात येते, नेमके तसेच उच्चशिक्षणातील व्यासंगी, कर्तव्यनिष्ठ आणि संस्थेशी बांधिलकी मानून सेवारत असलेली माणसे वयोमानपरत्वे निवृत्त होतात, तेव्हा उच्चशिक्षणाची परिसंस्थासुद्धा धोक्यात येते असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी केले. येथील कर्मवीर रामरावजी अहेर महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रा . डॉ. एकनाथ पगार यांच्या सेवापूर्ती समारंभप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य हितेंद्र अहेर होते. याप्रसंगी प्रा. पगार यांचा प्राचार्यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य डी. बी. पारंवाळ, प्रा. मालती अहेर, प्रा. व्ही. डी. सुर्यवंशी, बाळासाहेब शिंदे आदींनी मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयाच्या प्रगतीत प्रा. पगार यांनी दिलेल्या योगदानाचा प्राचार्य अहेर यांनी अध्यक्षीय भाषणात गौरवपूर्ण उल्लेख केला. राज्य पातळीवर दरवर्षी पुरस्कार संपादन करणाºया ‘बांधिलकी’च्या सर्व अंकातील निवडक लेख एकत्र करून ‘निवडक बांधिलकी’ हा अंक प्रा. पगार गौरव विशेषांक म्हणून करता येईल, अशी सुचना डॉ. धोंडगे यांनी केली. प्रास्तविक व सूत्रसंचलन प्रा. डॉ. जयवंत भदाणे यांनी तर प्रा. बापू रौंदळ यांनी आभार मानले.