दुध दरवाढ होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 07:01 PM2018-10-21T19:01:57+5:302018-10-21T19:02:06+5:30

मानोरी : दिवसेंदिवस ग्रामीण भागात शेती करणे आवाक्याबाहेर झाले असून, शेत पिकाला लागवड केल्यापासून ते पीक काढणीपर्यत मोठा खर्च करून ही शेतकºयांच्या पदरी निराशाच पडत आहे.

Due to lack of milk prices, farmers are angry | दुध दरवाढ होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी

दुध दरवाढ होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी

Next
ठळक मुद्देशेती बरोबर दुग्ध व्यवसाय करणे देखील आवाक्या बाहेर

मानोरी : दिवसेंदिवस ग्रामीण भागात शेती करणे आवाक्याबाहेर झाले असून, शेत पिकाला लागवड केल्यापासून ते पीक काढणीपर्यत मोठा खर्च करून ही शेतकºयांच्या पदरी निराशाच पडत आहे.
त्यातच वाढती महागाई विचारात घेता शेती म्हणजे एक प्रकारे जुगार खेळल्यासारखा प्रकार होत आहे. म्हणून ग्रामीण भागात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करत असतात. दूध दरवाढी साठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेले आंदोलनानंतरही दुधाला 18 ते 20 रु पयापर्यंत भाव मिळत असल्याने गायीच्या दूध वाढीसाठी घेतलेल्या खाद्याचा खर्च देखील फिटत नसल्याने शेती बरोबर दुग्ध व्यवसाय करणे देखील आवाक्या बाहेर झाले आहे.
ग्रामीण भागात दुग्ध व्यवसाय अनेक शेतकरी करत आहेत. गेल्या एक वर्षांपासून दुधाच्या दरात सतत घसरण झाली आहे. शासनाने शेतकरी व दुध उत्पादकांचे ही दुधाच्या दरात मोठी घसरण करून सर्व सामान्य शेतकर्यांचे कंबरडे मोडले आहे. सध्याची दुध व्यवसायची वस्तुस्थिती लक्षात घेता दुधाचा उत्पादन खर्च ही भरून निघणे कठीण झाले आहे. दूध स्वस्त, पाणी महाग या अशी स्थिती निर्माण झाली आहे. शेतातील कामे जवळपास संपले असून दूध व्यवसाय टिकवण्यासाठी शेतकºयांनी शेतात जेमतेम पाण्यावर गाईना खाण्यासाठी घास, हिरवे गवत, मका आदी चारा तयार करत आहे. परंतू या चाºयाची वाढ होणार नसल्याने उभ्या असलेल्या चाºयात गायी बांधून देत आहे. त्यामुळे दूध वाढीसाठी केलेला खर्च करून ही दूधाचे दर जैसे थे च आहे. आॅक्टोबर हिटमुळे उन्हाची लाट तीव्र असून चारा सुकण्यास सुरु वात झाली आहे. विहिरींनी तर केव्हाच तळ गाठला असल्याने पाणी द्यायचे कुठुन हा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
दूध वाढीसाठी अनेक प्रकारचे औषधे, ढेप, सरकी सारख्या खाद्यवस्तू खरेदी करतात. ढेपीच्या पन्नास किलो पोत्याच्या दर एक हजार रु पयांवर गेले आहे. गाईला एक ढेपीचे पोते साधारण दहा ते बारा दिवस जाते.त्यात गाईचा दवाखाना, बाकी खर्च विचारात घेता दुग्ध व्यवसाय धोक्यात आला असल्याचे शेतकरी सांगत आहे. येथील दुधाला गुजरात राज्याबरोबर बारामती, सिन्नर आदी सारख्या मोठ्या शहरात दूध निर्यात होत आहे.

दुधाला प्रति लिटर २५ रुपयांच्या पुढे भाव मिळणे गरजेचे असून गेल्या वर्षभरात दुधाच्या भावात सातत्याने घसरण झाली असून, इथुन पुढेही ही परिस्थिती कायम राहिली तर शेतकºयांना दूध नक्कीच पुन्हा रस्त्यावर ओतल्याशिवाय पर्याय राहणार नाही.
आनंदा शेळके, दुग्ध उत्पादक.

Web Title: Due to lack of milk prices, farmers are angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.