नांदगाव बसस्थानक प्रवाशांअभावी सुने सुने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:11 AM2021-05-28T04:11:36+5:302021-05-28T04:11:36+5:30
: शहरातील बसस्थानक कोविडकाळात बस प्रवाशांवाचून सुने सुने दिसत आहे. परिसर स्वच्छ असलेले नांदगावचे बसस्थानक कोविडकाळात निर्मनुष्य झाले ...
: शहरातील बसस्थानक कोविडकाळात बस प्रवाशांवाचून सुने सुने दिसत आहे. परिसर स्वच्छ असलेले नांदगावचे बसस्थानक कोविडकाळात निर्मनुष्य झाले आहे. सदैव वर्दळ असलेल्या बसस्थानकाला गेल्या दीड वर्षापासून कोविडमुळे ओहोटी लागली असून त्याचे परिणाम प्रवासी वाहतुकीवर झाले आहे. बसच्या फेऱ्या बंद असल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत असून आगाराचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
या आगाराच्या वतीने बंद काळात नादुरुस्त बसच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. चालक व वाहक कंटाळले असून लाॅकडाऊन उघडण्याची प्रतीक्षा कर्मचारी करत आहेत. खेळाचे स्टेडियम दिसावे, असे नांदगावचे बस स्थानक दिसत आहे. रिकाम्या बसस्थानकात उभी असलेली निळ्या रंगाची गाडी बघून, बसच्या जागी ही गाडी कुठून आली की, बसस्थानकात पे ॲण्ड पार्क सुरू केले आहे, अशी विचारणा करण्यात येत आहे.
दरम्यान, रेल्वेने कोविडचे कारण दाखवून येथील प्रवासी गाड्यांचे थांबे रद्द केल्याने नांदगावकर कोंडीत सापडले आहेत.
-----------------------------
नांदगाव येथील रिकाम्या बसस्थानकात उभी असलेली गाडी. (२७ नांदगाव १)
===Photopath===
270521\27nsk_3_27052021_13.jpg
===Caption===
२७ नांदगाव १